Rain Alert : पुढील काही तासात मुंबई व उपनगरात पावसाचा जोर वाढणार

माय मराठी
1 Min Read

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस (Rain Alert) सुरू झाला आहे. काही भागात वादळी वारे झाले आहेत. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागात वादळी वारे झाले आहेत. नरिमन पॉइंट, दादर, वरळी, परळ, शिव, कुर्ला तसेच घाटकोपर, पवई, भांडुप भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

दरम्यान, काही तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. चर्चगेट, परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, फोर्ट परिसरात पावसाची सर्वाधिक तीव्रता असेल. यामुळे, पावसाच्या अंदाजानुसार, गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन हवामान खात्याने लोकांना केले आहे.
हवामान खात्याने मुंबईसह मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत या भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल. नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, बेलापूर भागात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more