Rain Update : पुन्हा मुसळधार, मुंबईमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

माय मराठी
1 Min Read

मुंबईत पुन्हा पाऊस सुरू (Rain Update) झाला आहे. कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सध्या ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा परिणाम लोकल ट्रेन वाहतुकीवर लगेच दिसून आला आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

मुंबई आणि उपनगरात कालपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर आज दुपारनंतर मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू (Rain Update) झाला आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे आणि स्टेशनवर गर्दी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने पुढील २ ते ३ तास ​​मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, आता पाऊस सुरू झाला आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more