आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकिल सय्यद यांचे नेतृत्व खाली इस्लामपूर (SANGLI) एसटी बस स्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले. एसटी प्रवासी दरवाढ रद्द झाली च पाहिजे,एसटी महामंडळाचा धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, हा आवाज कोणाचा शिवसेचा अशा घोषणा नि एसटी बस स्थानक परिसर दणाणून सोडला.
यावेळी सय्यद म्हणाले राज्य शासन आधि लुट करतंय आणि मग दरवाढ हे शिवसेना खपवुन घेणार नाही. दोन महिन्यांपूर्वी राज्य परिवहन मंत्री सांगत आहेत एसटी महामंडळ 17कोटी नि फायद्यात आहे मग अशी काय दोन महीन्यात जादु.झाली एसटी रोज 3 कोटी ने तोट्यात आली. हा बनाव आहे, राज्य सरकार चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत.या मागे फक्त एसटी खाजगी करण करण्याचा डाव आहे आणि तो आम्ही शिवसैनिक हाणुन पाडु असं ठाम मत सय्यद यांनी व्यक्त केले.
आज महीलाना व विद्यार्थ्यांना प्रवासात सवलत आहे हे सोडुन दररोज 25 लाखाहुण अधिक प्रवासी प्रवास करतात या दरवाढीचा बोझा या 25 लाख प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे याला ईव्हीएम सरकार जबाबदार आहे. या सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो ही दरवाढ रद्द झाली च पाहिजे आणि कोणत्या परीस्थितीत एस टी महमंडळाचे खाजगीकरण होऊ देणार नाही यासाठी वाडी वस्ती व खेडोपाडी गावा गावात एसटी रोज च्या रोज फेरी झाली च पाहीजे असा नागरीकांचा ठराव करुण राज्य शासनाला पाठवु असं मत सय्यद यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थिती मधे रामराव थोरात, अशोक चव्हाण, तात्यासाहेब बामणे, साहील तांबोळी,राजु खान,बाळासाहेब तांबे,फजल हवालदार, संग्राम दमामे जमीर नालबंद, अरुण कुराडे, विनायक थोरात, सुनिल कोकरे , शब्बीर जमादार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.