इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रेणी सुधारणा इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक (supplementary exam) राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षा २४ जून २०२५पासून सुरू होणार असून, विविध अभ्यासक्रमांसाठी त्या जुलै महिन्यापर्यंत चालणार आहेत.
राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत – पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण – या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
बारावीची परीक्षा (supplementary exam) :
लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम): २४ जून ते १६ जुलै २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यांकन परीक्षा: २४ जून ते ११ जुलै २०२५
IT आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा: १५ व १६ जुलै २०२५
दहावीची परीक्षा (supplementary exam) :
लेखी व प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षा: २४ जून ते ८ जुलै २०२५
You Might Also Like
दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषय परीक्षा: २४ जून ते ४ जुलै २०२५
सविस्तर वेळापत्रक २२ मे पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अंतिम वेळापत्रक शाळेमार्फत
मंडळाने स्पष्ट केले आहे की संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक हे फक्त माहितीकरिता आहे. अंतिम, अधिकृत वेळापत्रक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत छापील स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया किंवा इतर संकेतस्थळांवरील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.