Schemes: महिलांसाठी सुरु करण्यात आलेली ‘ही’ योजना ३१ मार्च २०२५ पासून बंद होणार ?

माय मराठी
3 Min Read

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना ( Schemes) महिलांसाठी खास राबवण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. ही योजना आता लवकरच बंद होणार आहे. ३१ मार्च २०२५ या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख आहे. ही योजना महत्वाचे म्हणजे महिलांसाठी असून सरकारने या योजनेचा कालावधी वाढविलेला नाही. यामुळे ज्या महिलांनी या योजनेत पैसे गुंतविलेले नाहीत त्यांच्याकडे केवळ १५ दिवस बाकी आहेत.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) असे या योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत ही योजना चालविली जाते. या योजनेत महिलांसाठी गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. १ एप्रिलपासून ही योजना बंद होऊ शकते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिला आणि मुलींसाठी सुरु करण्यात आली होती.

भारत सरकारने ३१ मार्च २०२३ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ही योजना सुरु केली होती. दोन वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात आली. या योजनेत गुंतवणूकीसाठी मार्च २०२५ शेवटची तारीख आहे. यानंतर ही योजना बंददेखील होऊ शकते किंवा योजनेत गुंतवणूकीचा कालावधी वाढवलादेखील जाऊ शकतो. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करणे असा आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २ वर्षांचा आहे. तुम्ही २ वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करु शकतात. वार्षिक ७.५ टक्के व्याज या योजनेत मिळते. ही एक सुरक्षित योजना आहे.

तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेसाठी खाते उघडू शकतात. तुम्ही १००० रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवू शकतात. तुम्हाला या योजनेत २ वर्षानंतर चांगले व्याजदर मिळते. या योजनेत जर खातेधारकांचा मृत्यू झाला तर खाते बंद केले जाईल. तुम्ही चांगले व्याज या योजनेत मिळवू शकतात. जर तुम्ही दोन वर्षांसाठी या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २.३२ लाख रुपये मिळणार आहे. ही योजना एफडीप्रमाणेच काम करते. तुम्हाला या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागणार आहे. महिलांच्या खात्यात या योजनेच्या व्याज दर महिन्यांनी जमा केले जाते.

महिला बचत प्रमाणपत्र खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे महिला बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी आवश्यक असतील.

  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्ज

महिला बचत प्रमाणपत्र योजनेत खाते कसे उघडायचे?

  • या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल.
  • बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज ऑनलाइन भरू शकता आणि तो जमा करू शकता.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • घोषणापत्र आणि नामांकनाची माहितीयासोबतच देखील द्यावी लागेल.
  • मग तुम्हाला किती रकमेसह खाते उघडत आहात अर्ज फॉर्ममध्ये हे देखील सांगावे लागेल.
  • यानंतर, ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ चे प्रमाणपत्र बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून मिळवा.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more