Shatrinagar Hospital : प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू…डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील घटना

माय मराठी
2 Min Read

कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात (Shatrinagar Hospital) प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 12 तारखेला घडली. या प्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला असून विष्णुनगर पोलीसांनी मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.

सुवर्णा अविनाश सरोदे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून त्या डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथे राहत होत्या. सरोदे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

सुवर्णा सरोदे या गर्भवती होत्या आणि त्यांना 11 फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली, मात्र ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. डॉक्टरांनी रक्ताची कमतरता असल्याचे सांगून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले. काही वेळानंतर त्यांना बाहेर आणून तब्येत सुधारेल असे सांगण्यात आले, पण त्यांच्या प्रकृतीत कुठलाही सुधार दिसून आला नाही.

सुवर्णा यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, याच दरम्यान महिलेची गर्भाशय (पिशवी) काढण्यात आली व याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना आधी कुठलाही सल्लामसलत न करता केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.सायन रुग्णालयात हलविण्याची गरज आहे असे सांगितले. मात्र या दरम्यान तिची आणि आमची भेट होऊ दिली नाही त्यामुळे तिचा मृत्यू 2 तास आधीच झाला असल्याचा आरोप देखील महिलेच्या नवऱ्याने केला आहे .मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने सुवर्णा यांनी अखेरचा श्वास घेतला. तर डॉक्टरांनी कुटुंबीयांना माहिती दिली की, रक्तस्त्राव थांबवता आला नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता गर्भाशय काढण्यात आले आणि उपचारात निष्काळजीपणा दाखवण्यात आला, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.”

या प्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून, विष्णुनगर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. प्राथमिक चौकशी सुरू केली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more