Dombivli : डोंबिवलीमध्ये चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

माय मराठी
1 Min Read

विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

डोंबिवली (शंकर जाधव )

डोंबिवली Dombivli पूर्वेकडील दावडी मधील दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार 28 तारखेला दुपारच्या सुमारास घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ग्रील लावले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता, या विकासकावर गुन्हा दाखल करावा असे सांगत मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परी छोटूलाल बिंद असे मृत्यू पावलेल्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे. छोटूलाल हे पत्नी व दोन मुलीबरोबर नालासोपारा येथे राहतात. छोटूलाल हे आपल्या सहा वर्षाची मुलगी परीला घेऊन डोंबिवलीत राहत असलेल्या भावोजीकडे पूजेकरता सोमवारी आले. घरी पूजा सुरु असताना परी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. गॅलरीला ग्रील नसल्याने परी इमारतीवरून खाली पडून जागीच मृत्यू पावली. आवाज ऐकू येताच काही राहिवशी इमारती खाली जमा झाले. परीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात येथे नेले असता डॉक्टरांनी परी मृत्यू पावलेल्या सांगितले. परीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल करत असल्याचे सांगितले.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more