Special Train : उन्हाळी सुट्टीसाठी विशेष ट्रेनची सोय – ३३२ अतिरिक्त गाड्या प्रवाशांच्या सेवेत

माय मराठी
4 Min Read

मार्च महिना संपत आला असून उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Special Train) जवळ येत आहेत. या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते, त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी मध्य रेल्वेने ३३२ विशेष उन्हाळी रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई-नागपूर, करमळी, तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुरगी या मार्गांवर उपलब्ध असतील.

मुख्य विशेष गाड्या आणि वेळापत्रक:-

मुंबई – नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी (५० सेवा)

  • ट्रेन क्र. 02139 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०६.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ दर मंगळवार आणि रविवारी ००:२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे १५:३० वाजता पोहोचेल. (२५ सेवा)
  • ट्रेन क्र. 02140 – नागपूर येथून ०६.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ दर मंगळवार आणि रविवारी २०:०० वाजता सुटेल आणि CSMT येथे १३:३० वाजता पोहोचेल. (२५ सेवा)

मुंबई – करमळी साप्ताहिक विशेष गाडी (१८ सेवा)

  • ट्रेन क्र. 01151 – CSMT येथून १०.०४.२०२५ ते ०५.०६.२०२५ दर गुरुवारी ००:२० वाजता सुटेल आणि करमळी येथे १३:३० वाजता पोहोचेल. (९ सेवा)
  • ट्रेन क्र. 01152 – करमळी येथून १०.०४.२०२५ ते ०५.०६.२०२५ दर गुरुवारी १४:१५ वाजता सुटेल आणि CSMT येथे ०३:४५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी साप्ताहिक विशेष गाडी (१८ सेवा)

  • ट्रेन क्र. 01129 – LTT येथून १०.०४.२०२५ ते ०५.०६.२०२५ दर गुरुवारी २२:१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे १२:०० वाजता पोहोचेल. (९ सेवा)
  • ट्रेन क्र. 01130 – करमळी येथून ११.०४.२०२५ ते ०६.०६.२०२५ दर शुक्रवारी १४:३० वाजता सुटेल आणि LTT येथे ०४:०५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम साप्ताहिक विशेष गाडी (१८ सेवा)

  • ट्रेन क्र. 01063 – LTT येथून ०३.०४.२०२५ ते २९.०५.२०२५ दर गुरुवारी १६:०० वाजता सुटेल आणि तिरुअनंतपुरम येथे २२:४५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)
  • ट्रेन क्र. 01064 – तिरुअनंतपुरम येथून ०५.०४.२०२५ ते ३१.०५.२०२५ दर शनिवारी १६:२० वाजता सुटेल आणि LTT येथे ००:४५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)

पुणे – नागपूर साप्ताहिक अति जलद वातानुकुलित विशेष (२४ सेवा)

  • ट्रेन क्र. 01469 – पुणे येथून ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ दर मंगळवारी १५:५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे ०६:३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
  • ट्रेन क्र. 01470 – नागपूर येथून ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ दर बुधवारी ०८:०० वाजता सुटेल आणि पुणे येथे २३:३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)

पुणे – नागपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (२४ सेवा)

  • ट्रेन क्र. 01467 – पुणे येथून ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ दर बुधवारी १५:५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे ०६:३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
  • ट्रेन क्र. 01468 – नागपूर येथून १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ दर गुरुवारी ०८:०० वाजता सुटेल आणि पुणे येथे २३:३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)

दौंड – कलबुरगी अनारक्षित विशेष आठवड्यातून ५ दिवस (१२८ सेवा)

  • ट्रेन क्र. 01421 – दौंड येथून ०५.०४.२०२५ ते ०२.०७.२०२५ आठवड्यातून ५ दिवस ०५:०० वाजता सुटेल आणि कलबुरगी येथे ११:२० वाजता पोहोचेल. (६४ सेवा)
  • ट्रेन क्र. 01422 – कलबुरगी येथून ०५.०४.२०२५ ते ०२.०७.२०२५ आठवड्यातून ५ दिवस १६:१० वाजता सुटेल आणि दौंड येथे २२:२० वाजता पोहोचेल. (६४ सेवा)

दौंड – कलबुरगी अनारक्षित विशेष द्विसाप्ताहिक (५२ सेवा)

  • ट्रेन क्र. 01425 – दौंड येथून ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ दर गुरुवार आणि रविवारी ०५:०० वाजता सुटेल आणि कलबुरगी येथे ११:२० वाजता पोहोचेल. (२६ सेवा)
  • ट्रेन क्र. 01426 – कलबुरगी येथून ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ दर गुरुवार आणि रविवारी २०:३० वाजता सुटेल आणि दौंड येथे ०२:३० वाजता पोहोचेल. (२६ सेवा)

आरक्षणाची तारीख:सर्व विशेष ट्रेनसाठी बुकिंग २४ मार्च २०२५ पासून सुरू होईल. प्रवाशांनी लवकरात लवकर तिकिटे बुक करावीत. तिकिट बुकिंग साठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर www.irctc.co.in आणि सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे UTS अ‍ॅपद्वारेही बुक करता येतील.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more