विज्ञान कुठे कुठे काय प्रगती करेल (Sperm Race) आणि जगासमोर नवनवीन उदाहरण आणून ठेवेल यावर भरोसा नाही. देशामध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रम पार पडतात. शिवाय त्यामध्ये भाग घेणाऱ्यांची पण काही कमी नसते. अशीच एक वेगळी स्पर्धा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील हॉलिवूड पॅलेडियम येथे जगातील पहिली शुक्राणूंची शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
ही जगातील पहिली ‘शुक्राणूंची शर्यत स्पर्धा’ (Sperm Race) आहे. पुरुषांमधील घटत्या प्रजनन दराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २० सेंटीमीटरच्या ट्रॅकवर दोन शुक्राणू पेशी डिजिटल पद्धतीने धावताना दाखवल्या जातील. ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाईल.
जगातील पहिली शुक्राणूंची शर्यत २०२५ मध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही अनोखी स्पर्धा २५ एप्रिल रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणार आहे. ही शर्यत हॉलिवूडमधील हॉलिवूड पॅलेडियम येथे होणार आहे. येथे, २० सेंटीमीटर लांबीच्या सूक्ष्म ट्रॅकवर दोन खऱ्या शुक्राणूंची शर्यत धावेल.
हा ट्रॅक महिला प्रजनन प्रणालीसारखा दिसण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. या स्पर्धेचा उद्देश मनोरंजनाच्या पलीकडे आहे. यामागील उदात्त हेतू म्हणजे जगातील पुरुषांच्या प्रजनन दराबद्दल जागरूकता निर्माण करणे. गेल्या पन्नास वर्षांत पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या ५० टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. म्हणूनच, या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही अनोखी शर्यत आयोजित केली जात आहे.
ही शर्यत लाईव्ह मायक्रोस्कोप आणि एचडी कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड केली जाईल आणि सुमारे ४००० प्रेक्षक ही शर्यत लाईव्ह पाहतील. शर्यतीवर भाष्य केले जाईल. डेटा विश्लेषण आणि रिप्ले देखील दाखवले जातील, ज्यामुळे सामन्याच्या कार्यक्रमासारखे वातावरण तयार होईल. तसेच, प्रेक्षक त्यांच्या आवडत्या शुक्राणूंच्या नमुन्यावर पैज लावू शकतील.