डोंबिवली (प्रतिनिधी : शंकर जाधव)
डोंबिवलीतील नामवंत हॉली एंजल स्कूल ने आपल्या 21व्या शैक्षणिक वर्षातही उल्लेखनीय परंपरा कायम राखत, इयत्ता दहावीच्या (SSC Result )(CBSE) परीक्षेत 100 टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी बजावली आहे. एकूण 164 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 30% विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची आणि शिस्तशीर शैक्षणिक नियोजनाची साक्ष दिली आहे.
विशेष बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत, ज्यातून विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि शिक्षकांचे कुशल मार्गदर्शन स्पष्टपणे जाणवते.
या यशस्वी प्रवासामागे संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ. ओमेन डेविड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राचार्य बिजॉय ओमेन यांचे धोरणात्मक मार्गदर्शन, तसेच शिक्षकवर्गाची मेहनत, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य या सगळ्यांचा समन्वय आहे.
“हॉली एंजलमध्ये यश हा योगायोग नसून, ती आमची परंपरा आहे,” असे गौरवोद्गार डॉ. ओमेन डेविड यांनी यावेळी व्यक्त केले.
शाळेच्या वतीने अध्यक्ष, प्राचार्य, आणि सर्व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
इयत्ता दहावी (SSC Result) (CBSE) – 2025 चे गुणवंत विद्यार्थी:
नाव | टक्केवारी |
---|---|
1.श्रेयस गावस | 98.20% |
2.सिद्धी चौधरी | 97.20% |
3.युविका सामंत | 97.20% |
4.पार्थ कदम | 96.80% |