courier boy kalyan trailers – माय मराठी https://maaymarathi.com Fri, 30 May 2025 13:55:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png courier boy kalyan trailers – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Kalyan: तिकीट एजंटच्या विदेशी दारूतस्करीवर धडक १८.६३ लाखांचा साठा जप्त https://maaymarathi.com/ticket-agents-foreign-liquor-smuggling-busted-stock-worth-rs-18-63-lakh-seized/ https://maaymarathi.com/ticket-agents-foreign-liquor-smuggling-busted-stock-worth-rs-18-63-lakh-seized/#respond Fri, 30 May 2025 13:51:12 +0000 https://maaymarathi.com/?p=5944 (Kalyan) (शंकर जाधव)

तिकीट बुकिंगच्या नावाखाली परकीय स्कॉचची तस्करी करणाऱ्या एजंटचा भांडाफोड करत कल्याण  (Kalyan) उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उल्हासनगर, कल्याण आणि अंबरनाथ येथे छापे टाकून १८.६३ लाखांचा विदेशी स्कॉचचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अरुण पोपटानी, सूरज शुक्ला आणि दीपक ननकानी या तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

उल्हासनगरमधील ‘डायमंड हॉलीडेज’ या विमान व रेल्वे तिकीट व्यवहार करणाऱ्या कार्यालयातून ही अवैध तस्करी सुरू होती. दिल्लीहून उच्च प्रतीचा विदेशी स्कॉच आणून तो हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री केला जात होता. गुप्त माहितीनंतर उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण पथक क्र. २ ने पोपटानीच्या कार्यालयावर पहिला छापा टाकला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू साठवलेली आढळून आली.

पोपटानीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील छापे त्याच्या निवासस्थानी, इमारतीच्या पंपहाऊस मध्ये तसेच अंबरनाथमधील आणे गावातील ठिकाणी टाकण्यात आले. येथे त्याचे साथीदार सुरज शुक्ला आणि दीपक ननकानी यांनी देखील मोठ्या प्रमाणावर स्कॉचच्या बाटल्यांचा साठा ठेवला होता.

या एकूण कारवाईत विविध ब्रँडच्या ३५२ विदेशी स्कॉचच्या बाटल्या, दोन वाहने आणि एकूण १८,६३,४४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब व त्यांच्या टीमने केली आहे.

]]>
https://maaymarathi.com/ticket-agents-foreign-liquor-smuggling-busted-stock-worth-rs-18-63-lakh-seized/feed/ 0