dombivli latest news – माय मराठी https://maaymarathi.com Fri, 02 May 2025 07:50:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png dombivli latest news – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Dombivli:डोंबिवलीकरांनो सावधान आधीच गर्दी त्यामध्ये आता वाढती गुन्हेगारी https://maaymarathi.com/dombivli-residents-be-careful-ready-crowd-crime-increasing/ https://maaymarathi.com/dombivli-residents-be-careful-ready-crowd-crime-increasing/#respond Fri, 02 May 2025 07:50:00 +0000 https://maaymarathi.com/?p=5628 डोंबिवली (Dombivli) रेल्वे पोलिसांनी एका महिला चोराला नुकतीच अटक केली आहे, जी लोकल ट्रेनमध्ये महिलांकडून पैसे आणि दागिने चोरण्यासाठी आपल्या भोळ्या आणि धूर्त चेहऱ्याचा वापर करत होती. ती रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना कोणत्या ना कोणत्या बहाण्याने गप्पा मारत असे आणि त्यांच्या पर्समधून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरत असे. या महिला चोराचे नाव वैशाली सचदेव आहे आणि ती रेकॉर्डवर गुन्हेगार आहे आणि तिच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती डोंबिवली (Dombivli) रेल्वे पोलिसांनी दिली.

रेल्वे प्रवासादरम्यान, गेल्या काही दिवसांत लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात गप्पा मारत आणि गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स आणि मोबाईल फोन चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, डोंबिवली रेल्वे पोलिसांनी लोकल ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर बळी पडणाऱ्यांची संख्या वाढवली होती. दरम्यान, संध्याकाळी ६:३० च्या सुमारास काही महिलांना डोंबिवलीहून आसनगावला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून त्यांचे मोबाईल फोन आणि लहान पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले.

तथापि, यापैकी काही महिलांना महिलेची पर्स उघडी असल्याने संशय आला. त्यांनी महिलेला दूर ढकलले, पण तिने उत्तर दिले नाही, उलट तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हे पाहून लोकल ट्रेनमधील इतर महिलांनी आरडाओरडा केला आणि प्लॅटफॉर्मवर गस्त घालणाऱ्या डोंबिवली रेल्वे पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता, तिच्याकडे चोरीचा महागडा मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम आढळली.

अखेर, पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली आणि तिने गुन्हा कबूल केला. रेल्वेच्या महिला डब्यातील महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने, लहान पर्स, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरल्याबद्दल तिच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी वैशालीला बेड्या ठोकल्या आहेत आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-residents-be-careful-ready-crowd-crime-increasing/feed/ 0
Dombivli:कारवाई करू नये म्हणून रिक्षाचालकांनी अडवली आरटीओची गाडी https://maaymarathi.com/dombivli-auto-drivers-blocked-rto-vehicle-avoid-take-action/ https://maaymarathi.com/dombivli-auto-drivers-blocked-rto-vehicle-avoid-take-action/#respond Fri, 11 Apr 2025 14:05:03 +0000 https://maaymarathi.com/?p=5425 डोंबिवली ( शंकर जाधव )

डोंबिवलीतील (Dombivli) इंदिरा चौकात रिक्षाचालक संतापले नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाचालक यांच्यावर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ) बुधवार 7 तारखेला सायंकाळच्या सुमारास डोंबिवलीत कारवाई सुरु होती. डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील इंदिरा चौकात आरटीओचे अधिकारी कारवाई करता आले असता कारवाईला विरोध करत संतापलेल्या रिक्षाचालकांनी त्यांची गाडी अडवली.

काही वेळ या ठिकाण वाहनाची लांब लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.रिक्षाचालकांनी कारवाई नको अशी भूमिका घेतली होती तर आरटीओ अधिकाऱ्यांनी मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

डोंबिवलीतील वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील हे स्वतः रस्त्यावर उभे राहून वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देतात. तर डोंबिवली वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते.नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर बुधवारी आरटीओने डोंबिवलीतील कारवाई केली.

मात्र काही रिक्षाचालकांनी चक्क इंदिरा चौकात आरटीओची गाडीची रोखली. कारवाई करू नका, दंड आकारू नका, आमची जगायचे कसे?, आधीच कर्ज त्यात दंङ मग कस पोट भरणार असा प्रश्न रिक्षाचालकांनी यावेळी उपस्थित केला. मात्र नियम पाळा कारवाई होणार नाही असे आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना सांगितले.

याबाबत MH 05 वाहतूक प्रवासी संघटना संस्थापक अध्यक्षा वंदना सिंह सोनावणे म्हणाल्या, रिक्षाचालकांची दादागिरी व मुजोरीमुळे, प्रवासी कित्येक वर्ष त्रासलेले आहेत. आज तो त्रास आरटोओला झाला आहे त्यावरून डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेची थोडी कल्पना आली असावी.आम्ही नेहमी आरटीओ आणि प्रशासन कडे मागणी केली आहे की, कायदे आहेत तर त्यांची कडक अंमलबजावणी करा आणि यांना शिस्त लावा.

आम्हाला पर्यायी ट्रान्सपोर्ट व्यवस्था उपलब्ध करून द्या. EV बसची मागणी करत करत 8 वर्षात 50 EV रस्त्यावर आल्या पण आम्हाला दिसल्या नाहीत. 250 ची हमी होती आता 250 एक बस कधी येतील देव जाणे. तर जो पर्यंत कायद्यांची अमलबजावणी, पर्यायी ट्रान्सपोर्ट व्यवस्था उपलब्ध होणार नाही असे दिसते.

डोंबिवलीत परिस्थिती चिघळतच राहणार कधी प्रवाश्यांना त्रास तर कधी अधिकाऱ्यांना त्रास होणार. बरं सगळेच ऑटो वाले वाईट वागतात अस नाहीत पण जे वागतात त्या त्या रिक्षाचालकांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो.
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील. डोंबिवली आरटीओची गाडी रिक्षाचालकांनी अडवली असली तरी कारवाई सूरूच होती. आरटीओकडून कारवाईत सातत्य राहील.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-auto-drivers-blocked-rto-vehicle-avoid-take-action/feed/ 0
Dombivli : डोंबिवलीमध्ये चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू https://maaymarathi.com/six-year-old-girl-dies-after-falling-from-fourth-floor-in-dombivli/ https://maaymarathi.com/six-year-old-girl-dies-after-falling-from-fourth-floor-in-dombivli/#respond Tue, 28 Jan 2025 13:27:43 +0000 https://maaymarathi.com/?p=4067 विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

डोंबिवली (शंकर जाधव )

डोंबिवली Dombivli पूर्वेकडील दावडी मधील दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार 28 तारखेला दुपारच्या सुमारास घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ग्रील लावले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता, या विकासकावर गुन्हा दाखल करावा असे सांगत मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परी छोटूलाल बिंद असे मृत्यू पावलेल्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे. छोटूलाल हे पत्नी व दोन मुलीबरोबर नालासोपारा येथे राहतात. छोटूलाल हे आपल्या सहा वर्षाची मुलगी परीला घेऊन डोंबिवलीत राहत असलेल्या भावोजीकडे पूजेकरता सोमवारी आले. घरी पूजा सुरु असताना परी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. गॅलरीला ग्रील नसल्याने परी इमारतीवरून खाली पडून जागीच मृत्यू पावली. आवाज ऐकू येताच काही राहिवशी इमारती खाली जमा झाले. परीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात येथे नेले असता डॉक्टरांनी परी मृत्यू पावलेल्या सांगितले. परीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल करत असल्याचे सांगितले.

]]>
https://maaymarathi.com/six-year-old-girl-dies-after-falling-from-fourth-floor-in-dombivli/feed/ 0
Thane : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी दिपेश म्हात्रे यांची नियुक्ती https://maaymarathi.com/dipesh-mhatre-appointed-as-district-chief/ https://maaymarathi.com/dipesh-mhatre-appointed-as-district-chief/#respond Tue, 28 Jan 2025 13:19:16 +0000 https://maaymarathi.com/?p=4064 डोंबिवली ( शंकर जाधव )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिपेश म्हात्रे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. दिपेश म्हात्रे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत यांनी शिवसेना पक्षाला (शिंदे गट) सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे नेते तथा सचिव विनायक राऊत यांनी दिपेश म्हात्रे यांना डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा विधानसभा (Thane) क्षेत्र जिल्हाप्रमुख व डोंबिवलीतील जेष्ठ नगरसेवक तात्या माने यांना डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्र जिल्हासंघटक पदी नियुक्ती केले.

]]>
https://maaymarathi.com/dipesh-mhatre-appointed-as-district-chief/feed/ 0
Dombivli : सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध https://maaymarathi.com/amarathis-oppose-satyanarayan-puja-and-haldi-kumku-program/ https://maaymarathi.com/amarathis-oppose-satyanarayan-puja-and-haldi-kumku-program/#respond Tue, 28 Jan 2025 13:09:52 +0000 https://maaymarathi.com/?p=4061 डोंबिवली ( शंकर जाधव )

सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला मराठी कुटुंबीयांना विरोध करत मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे. ही डोंबिवलीजवळील (Dombivli) नांदिवली मधील एका सोसायटीत घडली. या वादातून सोसायटीमध्ये गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला.रविवारी रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले असल्याचा मराठी कुटुंबियांनी आरोप केला आहे.याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवुन घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला आहे.

]]>
https://maaymarathi.com/amarathis-oppose-satyanarayan-puja-and-haldi-kumku-program/feed/ 0