environmental safety – माय मराठी https://maaymarathi.com Tue, 10 Jun 2025 13:37:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png environmental safety – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Dombivli: निळा पाऊस नव्हे, टेम्पोमधून सांडलेले रंगीत पाणी – कामा संघटनेचे स्पष्टीकरण https://maaymarathi.com/dombivli-not-blue-rain-but-colored-water-spilled-from-a-tempo-clarification-from-kama-sanghatana/ https://maaymarathi.com/dombivli-not-blue-rain-but-colored-water-spilled-from-a-tempo-clarification-from-kama-sanghatana/#respond Tue, 10 Jun 2025 13:36:55 +0000 https://maaymarathi.com/?p=6138 शंकर जाधव (Dombivli)

डोंबिवली (Dombivli) फेस-२ भागात निळ्या रंगाचे पाणी आढळून आल्यानंतर परिसरात ‘निळा पाऊस’ पडल्याची अफवा पसरली होती. या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही माहिती चुकीची असून, निळा पाऊस नव्हे तर टेम्पोमधून सांडलेले रंगीत पाणी असल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष राजू बेल्लूर यांनी स्पष्ट केले.सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

या संदर्भात बेल्लूर म्हणाले, फेस-२ मध्ये एका टेम्पोमधून निळ्या रंगाचा माल (रंगीत द्रव) उतरवण्यात आला होता. माल उतरवल्यानंतर टेम्पो तेथेच उभा करण्यात आला आणि त्यातून काही प्रमाणात निळा रंग रस्त्यावर सांडला. दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे तो रंग वाहून गेला.

या घटनेची माहिती मिळताच कामा संघटनेचे पदाधिकारी आणि सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याचे नमुने तपासले असता, त्यामध्ये कोणताही रासायनिक घटक नसल्याचे स्पष्ट झाले.

बेल्लूर यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, “डोंबिवलीत निळा पाऊस पडल्याची बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे. ही फक्त चुकीची समजूत होती,” असे त्यांनी सांगितले.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-not-blue-rain-but-colored-water-spilled-from-a-tempo-clarification-from-kama-sanghatana/feed/ 0