flat for sale in dombivli – माय मराठी https://maaymarathi.com Fri, 11 Apr 2025 06:35:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png flat for sale in dombivli – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Dombivli: डोंबिवलीत हिरवा पावसानंतर काळा पाऊस https://maaymarathi.com/dombivli-black-rain-after-green-rain-in-dombivli/ https://maaymarathi.com/dombivli-black-rain-after-green-rain-in-dombivli/#respond Tue, 08 Apr 2025 12:51:01 +0000 https://maaymarathi.com/?p=5397 मनसेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला विचारला जाब

डोंबिवली ( शंकर जाधव ) 

काही वर्षापूर्वी डोंबिवली (Dombivli) औद्योगिक परिसरात हिरवा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता चक्क दोन दिवस डोंबिवलीजवळील एमआयडीसीतील  काही भागात चक्क काळा पाऊस पडला. काळा पाऊस पडल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता दर्शविणारे मशीन डोंबिवलीपासून (Dombivli) लांब अंतरावर बसवले आहेत. तर विभागाचे कार्यालय कल्याण आहे. डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय कां नाही? काळा पासून पडूनही एकही अधिकारी का दखल घेत नाही? याचा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार 8 तारखेलाजाब विचारण्या करता गेले असता डोंबिवलीत कार्यालय का नाही असा प्रश्न उपस्थित केला.

दोन दिवस डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये काळा पाऊस, काळा रंगाच्या ठिपके पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार  प्रमोद ( राजू  ) पाटील यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी व मनसैनिकांनी  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा अध्यक्ष सुदेशजी चुडणाईक, विधानसभा सचिव उदय  वेळासकर, अरुण जांभळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंदजी म्हात्रे, शहर संघटक तकदिर काळण, हरीष पाटील, शहर सचिव संदीप ( रमा ) म्हात्रे, उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील,विभाग अध्यक्ष संजय चव्हाण,रवी गरुड, रक्षीत गायकर, प्रदीप चौधरी, संजय पाटील, कदम भोईर,महिला विभाग अध्यक्षा संगिता खोत पदाधिकारी , उपविभाग अध्यक्ष , महिला व पुरुष शाखा अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डोंबिवलीत कार्यालय नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी कार्यालयात बोलावून घेत त्यांना जाब विचारला.आपलं कार्यालय कल्याण मध्ये का? डोंबिवलीकरांना वाऱ्यावर सोडून पालक ठाण्याला आणि अधिकारी कल्याणला अशा प्रकारचे वातावरण या ठिकाणी  का असा जाब मनसेने विचारला.

आपण आपलं काम योग्यरीत्या व व्यवस्थितपणे पार पाडावी अशी सूचना वजा इशारा यावेळी मनसेने अधिकाऱ्यांना दिला.पुढील दोन दिवसात २४ तास उपलब्ध होतील असे अधिकारी डोंबिवलीमध्ये बसवु व हवेतील गुणवत्ता दर्शवणारा फलक एमआयडीसी परिसरात लावू असे  आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला.

अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांच्या स्तलांतरचे पुढे काय झाल?

गेल्या वर्षी डोंबिवलीतील (Dombivli) एका कंपनीच्या स्फ़ोटाप्रकरणी मंत्री उद्या सामंत हे घटनास्थळी आले असता  डोंबिवलीजवळील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करण्याचाबाबतचा धोरणत्मक निर्णय झाल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र त्यानंतर या निर्णयाचे पुढे काय झाला असा प्रश्न यावेळी मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी उपस्थित केला.

डोंबिवली एमआयडीसी भागात प्रदूषण मोजणारे आणखी एक मशीन लावणार

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ प्रदूषण मोजणारे मशीन लावले आहे. डोंबिवलीतही छत्रपती शिवाजी महाराज चौकांजवळ एक मशीन लावणार आहे असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असे नाव लिहा….

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय कल्याण शहरात मात्र डोंबिवलीतील (Dombivli) प्रदूषण पाहणार का? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यात नियंत्रण असा शब्द काढू त्याऐवजी महाराष्ट्र  प्रदूषण मंडळ असे लाव लिहा असा उपहासत्मक सल्ला यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने यावेळी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-black-rain-after-green-rain-in-dombivli/feed/ 0
Dombivli : डोंबिवलीत बेकायदा चार मजली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली https://maaymarathi.com/khambalpada-dombivli-four-floor-building-lapesed/ https://maaymarathi.com/khambalpada-dombivli-four-floor-building-lapesed/#respond Tue, 04 Mar 2025 12:39:15 +0000 https://maaymarathi.com/?p=4608 डोंबिवली (Dombivli) डोंबिवलीत बेकायदा चार मजली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली पूर्वेतील ठाकुर्ली खंबाळपाडा भागात असलेल्या पालिकेच्या उद्यानाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधलेली चार मजली इमारत पालिकेच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ही बेकायदा इमारत चेतन माळी यांनी अधिकृत शंकेश्वर व्हिला इमारतीच्या शेजारील उद्यानासाठी राखीव जागेवर उभारली होती. या इमारतीला आधीच अनधिकृत घोषित करून चेतन माळी यांना ती स्वतःहून पाडण्याची नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी ती न तोडल्यामुळे पालिकेने स्वतः ही कारवाई केली.

पालिकेने आधीच चेतन माळी यांच्याविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिलेल्या आदेशानुसार, रिकाम्या बेकायदा इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश होते. त्यामुळे सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी आणि शक्तिमान कापकाम यंत्राच्या सहाय्याने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

खंबाळपाडा हा व्यवस्थित नियोजनबद्ध भाग आहे, आणि त्याच्या उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदा इमारत उभारल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये मोठा रोष होता. या कारवाईमुळे या परिसरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

नागरिकांची मागणी आहे की पालिकेने या उद्यानाच्या भूखंडाला तातडीने संरक्षित भिंत घालून सुरक्षित करावे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी बेकायदा बांधकामे होणार नाहीत.

]]>
https://maaymarathi.com/khambalpada-dombivli-four-floor-building-lapesed/feed/ 0