global bicycle day 2020 – माय मराठी https://maaymarathi.com Tue, 03 Jun 2025 07:55:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png global bicycle day 2020 – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Dombivli: आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त महिलांची सायकल फेरी https://maaymarathi.com/dombivli-womens-cycle-ride-on-international-bicycle-day/ https://maaymarathi.com/dombivli-womens-cycle-ride-on-international-bicycle-day/#respond Tue, 03 Jun 2025 07:54:33 +0000 https://maaymarathi.com/?p=5989 Dombivli (शंकर जाधव)

डोंबिवली (Dombivli) एमआयडीसी परिसरातील ‘एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप’ तर्फे आज, ३ जून रोजी, आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीत सुमारे ४० सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. या फेरीद्वारे पर्यावरण संरक्षण, आरोग्यवर्धन व नियमित व्यायामाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले.

फेरीदरम्यान सहभागी सदस्यांनी परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून सायकल फिरवून घोषणांद्वारे जनजागृती केली. महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश असलेल्या या ग्रुपचे पुढचे पाऊलही स्तुत्य आहे.

या ग्रुपचे ४२ सदस्य १८ जून रोजी सायकलवरून पंढरपूर आषाढी वारीसाठी निघणार असून, २२ जून रोजी परत येणार आहेत. वारीदरम्यान पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांना सेवा व मदत करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्या सेवेसाठी एक बस, टेम्पो व रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या वारीत सहभागी सायकल ग्रुप व वारकऱ्यांसाठी जे नागरिक आर्थिक किंवा वस्तूरूपात मदत करू इच्छितात, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी पाण्याच्या बाटल्या, एनर्जी ड्रिंक्स, औषधे, बिस्किटे, शेंगदाणे, बटर चिक्की, ORS ड्रिंक्स, फळे इत्यादी पदार्थांचे स्वागत आहे.

संपर्क:
सौ. हर्षल सरोदे – 8424927311
ठिकाण: शुभम उदबत्ती स्टॉल, कावेरी चौक, एमआयडीसी, डोंबिवली (Dombivli)

]]>
https://maaymarathi.com/dombivli-womens-cycle-ride-on-international-bicycle-day/feed/ 0