Holi Vibes – माय मराठी https://maaymarathi.com Thu, 13 Mar 2025 12:46:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png Holi Vibes – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Holi : होळीचा रंग निघत नाही आहे? वापरून बघा या सोप्या घरगुती टिप्स https://maaymarathi.com/holi-holi-colors-not-coming-out-try-these-simple-home-tips/ https://maaymarathi.com/holi-holi-colors-not-coming-out-try-these-simple-home-tips/#respond Thu, 13 Mar 2025 12:42:24 +0000 https://maaymarathi.com/?p=4864 होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण मात्र, खेळताना वापरलेले रंग त्वचेवर, केसांमध्ये आणि कपड्यांवर घट्ट बसतात आणि निघायला खूप वेळ लागतो. केमिकलयुक्त रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने काढणे महत्त्वाचे आहे. बाजारातील हार्श साबण किंवा स्क्रब वापरल्याने त्वचा कोरडी आणि रफ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपायच अधिक फायदेशीर ठरतात.

होळी खेळण्यापूर्वी त्वचेला तेल किंवा मॉइश्चरायझर लावल्यास रंग त्वचेत मुरत नाही, त्यामुळे काढणे सोपे होते. जर रंग आधीच लागू लागला असेल, तर काही घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. बेसन आणि दही एकत्र करून बनवलेली पेस्ट रंग लागलेल्या भागावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास रंग सहज निघतो. तसेच, बदाम वाटून त्यामध्ये दूध मिसळून तयार केलेली पेस्टही प्रभावी ठरते. गुलाबपाणी आणि लिंबाच्या रसाचा वापर केल्याने त्वचेला फ्रेश वाटते आणि रंग लवकर निघतो. याशिवाय, ओलिव्ह ऑइल किंवा नारळ तेल लावून काही वेळ मसाज केल्यास रंग मऊ होतो आणि साबणाने सहज निघतो.

होळीचा प्रत्येक रंग काय सांगतो ?

केसांमधून रंग काढण्यासाठीही काही सोपे उपाय आहेत. होळी खेळण्याआधी केसांना तिळाचे किंवा खोबरेल तेल लावल्यास रंग मुरत नाही. रंग बसला असल्यास गरम खोबरेल तेलाने मसाज करून नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. दही आणि लिंबू मिसळून लावल्यानेही रंग पटकन निघतो. बिअर रिंस केल्याने रंग मऊ होतो आणि सहज धुतला जातो. तसेच, मेथी दाणे भिजवून दह्यात मिसळून केसांना लावल्यास रंग जाईल आणि केस चमकदार राहतील.

काही रंग कपड्यांवर पक्के बसतात, पण काही घरगुती उपाय वापरल्यास ते सहज निघू शकतात. कपडे कोमट पाण्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडासोबत भिजवल्यास रंग कमी होतो. पांढऱ्या कपड्यांसाठी हायड्रोजन पेरॉक्साईड वापरू शकता, पण आधी एका छोट्या भागावर टेस्ट करून बघा. कपडे लवकर धुतल्यास रंग खोलवर मुरत नाही, त्यामुळे होळी खेळल्यानंतर शक्य तितक्या लवकर कपडे धुणे चांगले.

 मुंबईत होळी-धुलीवंदनाला डीजे आणि लाऊडस्पीकर बंदी; आदित्य ठाकरे काय म्हणाले

नखे आणि नखांच्या भोवती रंग लागत असेल, तर लिंबाचा रस लावून ठेवल्यास रंग सहज निघतो. पांढऱ्या टूथपेस्टने नखे चोळल्यासही रंग निघतो. तसेच, व्हिनेगर आणि पाण्यात बोटं काही वेळ भिजवून ठेवल्यास नखांवरील रंग कमी होतो.

रंग त्वचेत किंवा केसांमध्ये जास्त वेळ टिकू नये यासाठी काही गोष्टी आधीच करून ठेवाव्यात. होळी खेळण्याआधी खोबरेल किंवा ऑलिव्ह तेल त्वचेवर आणि केसांवर लावा. गडद रंगाचे किंवा जुन्या कपड्यांचेच वापर करा, जे खराब झाले तरी चालतील. डोळ्यांमध्ये रंग जाऊ नये म्हणून गॉगल्स किंवा मोठे सनग्लासेस घाला. ओठ कोरडे पडू नयेत म्हणून लिप बाम लावा. होळी खेळण्याआधी नखे लहान ठेवा आणि त्यांना वॉटरप्रूफ नेलपेंट लावा, यामुळे रंग लगेच निघेल.

स्वादिष्ट पेय आणि आरोग्याचा खजिना

होळीचा आनंद घेताना त्वचा, केस आणि कपड्यांची योग्य काळजी घेतल्यास नंतर रंग काढण्याचा त्रास कमी होतो. घरगुती आणि नैसर्गिक उपायांचा वापर केल्याने कोणतेही नुकसान न होता त्वचा आणि केस निरोगी राहतात. वरील उपाय वापरून बघा आणि होळीचा सण अजून आनंदाने साजरा करा.

]]>
https://maaymarathi.com/holi-holi-colors-not-coming-out-try-these-simple-home-tips/feed/ 0
Holi : होळीचा प्रत्येक रंग काय सांगतो ? https://maaymarathi.com/holi-what-does-each-color-of-holi-mean/ https://maaymarathi.com/holi-what-does-each-color-of-holi-mean/#respond Thu, 13 Mar 2025 12:03:35 +0000 https://maaymarathi.com/?p=4855 होळी (Holi) हा केवळ रंगांचा सण नसून, तो प्रेम, आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ असतो आणि तो आपल्या नात्यांवरही प्रभाव टाकतो. तुम्ही होळी खेळताना कोणता रंग वापरत आहात, यामागे एक विशिष्ट संदेश दडलेला असतो. म्हणूनच, यावर्षी होळी खेळण्याआधी जाणून घ्या प्रत्येक रंगाचा अर्थ आणि तुमच्या प्रियजनांना योग्य रंग निवडून त्यांच्याशी नात्याचा गडद रंग कसा वाढवता येईल

लाल रंग – प्रेम आणि ऊर्जा
लाल रंग प्रेम, आत्मियता आणि उर्जेचे प्रतीक आहे. हा रंग उत्साह, उत्कटता आणि ताकदीचा संदेश देतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा प्रिय व्यक्तीला लाल रंग लावत असाल, तर तो तुमच्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची निशाणी असते. भारतीय संस्कृतीत लाल रंग शुभ मानला जातो आणि तो विवाह, उत्सव आणि मांगल्याशी जोडला जातो. त्यामुळे या होळीला तुमच्या प्रिय व्यक्तीवर लाल रंग उधळा आणि त्यांच्यावरील प्रेम अधिक गहिरं करा.

पिवळा रंग – आनंद आणि सकारात्मकता
पिवळा रंग उत्साह, सकारात्मकता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग मन प्रसन्न ठेवतो आणि कोणत्याही नात्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. होळीच्या दिवशी जर तुम्ही पिवळा रंग वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहात. हा रंग स्नेह, सौभाग्य आणि समृद्धीचे द्योतक आहे.

स्वादिष्ट पेय आणि आरोग्याचा खजिना

हिरवा रंग – नवीन सुरुवात आणि समृद्धी
हिरवा रंग निसर्गाचा रंग आहे, जो ताजेपणा, नव्या संधी आणि वाढीचे प्रतीक आहे. हा रंग नात्यात स्थिरता आणि विश्वास निर्माण करतो. जर तुम्ही आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करत असाल, नवीन संधी शोधत असाल किंवा नात्यात सकारात्मक बदल घडवू इच्छित असाल, तर हिरवा रंग योग्य पर्याय आहे.

निळा रंग – विश्वास आणि समर्पण
निळा रंग हा स्थिरता, शांतता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा रंग नात्यातील विश्वास आणि निस्वार्थ प्रेम दाखवतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दीर्घकालीन आणि स्थिर नातं हवं असेल, तर निळा रंग हा परिपूर्ण पर्याय आहे. हा रंग नात्यात सन्मान, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे.

होळी सणासाठी मुंबई पोलिसांचे विशेष नियम

जांभळा रंग – रहस्य आणि आध्यात्मिकता
जांभळा रंग हा गूढता, प्रेरणा आणि आध्यात्मिक उंचीचं प्रतीक आहे. हा रंग नात्यात गहनता आणि जादुई आकर्षण निर्माण करतो. ज्या नात्यांमध्ये आध्यात्मिक जोड आहे, त्या नात्यांसाठी हा रंग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

केशरी रंग – उत्साह आणि सकारात्मकता
केशरी रंग हा नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि जोश दर्शवतो. हा रंग नात्यातील उत्साह वाढवतो आणि संबंध अधिक उबदार करतो. हा रंग जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना लावत असाल, तर तो त्यांच्या जीवनात प्रेरणा आणि आत्मविश्वास भरतो.

]]>
https://maaymarathi.com/holi-what-does-each-color-of-holi-mean/feed/ 0