how home loan works – माय मराठी https://maaymarathi.com Tue, 08 Apr 2025 06:56:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png how home loan works – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Home Loan Tips: २५ वर्षांचं कर्ज १० वर्षांत फेडा या सोप्या टिप्स वापरा! https://maaymarathi.com/home-loan-tips-to-pay-off-a-25-yr-loan-in-10-year/ https://maaymarathi.com/home-loan-tips-to-pay-off-a-25-yr-loan-in-10-year/#respond Mon, 07 Apr 2025 11:26:38 +0000 https://maaymarathi.com/?p=5370 जर तुम्ही होम लोन घेतले असेल (Home Loan Tips) आणि या कर्जाचे नियमित हप्ते देखील भरत आहात तरी देखील टेन्शन असतेच. कारण एक जरी हप्ता वेळेवर भरला गेला नाही तरी क्रेडिट स्कोअर खराब (Credit Score) तर होतोच शिवाय बँकेचे वेगळे चार्जेस देखील द्यावे लागतात.

कर्जाची मुदतही 20 किंवा 25 वर्षांची असते. त्यामुळे इतकी वर्षे नियमित हप्ते भरावेच लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की 25 वर्षे मुदतीने घेतलेले कर्ज Home Loan Tips तुम्ही दहा वर्षांतही मिटवू शकता. अशा कोणत्या टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही कर्जाचा भार लवकरात लवकर मिटवू शकता. आज याच बाबतीत माहिती घेऊ या..

50 लाखांच कर्ज अन् 40 हजार ईएमआय

एखाद्या कर्जदाराने 50 लाख रुपयांचे कर्ज 25 वर्षांच्या मुदतीने घेतलेलं असेल. बँकेने या कर्जासाठी साडेआठ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या हिशोबाने मंथली ईएमआय 40 हजार रुपये होईल. सुरुवातीच्या टप्प्यात बँक कर्जावर व्याजाची जास्त वसुली करतात. म्हणजेच जर 40 हजार दरमहा प्रमाणे 4.80 लाख रुपयांचा भरणा केला तर यातील फक्त 60 हजार रुपयेच कर्जाच्या एकूण रकमेतून कट होतात. बाकीचे पैसे व्याजाचे असतात.

या आहेत सोप्या टिप्स

अशा परिस्थितीत जर तुम्ही 25 वर्षांचे कर्ज फक्त 10 वर्षांत मिळवू इच्छित असाल तर यासाठी योग्य स्ट्रटेजी तयार करून पेमेंट करावे लागेल. यात पहिली पायरी म्हणजे तुम्ही दरवर्षी एक ईएमआय एक्स्ट्रा भरत चला. याचा फायदा म्हa णजे ही रक्कम तुमच्या कर्जाच्या प्रिन्सिपल अमाउंटमधून कट होईल. यामुळे कर्जाचा कालावधी 25 वर्षांवरून 20 वर्षांपर्यंत कमी होईल.

दुसरी महत्वाची पायरी म्हणजे तुम्हाला दरवर्षी तुमचा ईएमआय 7.5 टक्के दराने वाढवावा लागेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा कर्जाचा कालावधी 25 वर्षांवरून थेट 12 वर्षांवर येईल. कर्जाचा कालावधी कमी झाल्याने तुम्हाला कमी कालावधीसाठी कमी रक्कम द्यावी लागेल. यामुळे कर्जाच्या चक्रातून तुम्ही लवकर मोकळे व्हाल.

तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्हाला दरवर्षी एक एक्स्ट्रा ईएमआय भरावी तर लागेलच पण त्याबरोबरच दरवर्षी ईएमआय 7.5 टक्के वाढवला. या दोन्ही गोष्टी तुम्ही बरोबर केल्या तर तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होऊन थेट 10 वर्षांवर येईल.

]]>
https://maaymarathi.com/home-loan-tips-to-pay-off-a-25-yr-loan-in-10-year/feed/ 0
Home Loan : होमलोन घेत आहात? तर या काही गोष्टींची पूर्व तयारी नक्की करा… https://maaymarathi.com/home-loan-taking-a-home-loan-so-make-sure-to-prepare-these-things-in-advance/ https://maaymarathi.com/home-loan-taking-a-home-loan-so-make-sure-to-prepare-these-things-in-advance/#respond Fri, 21 Feb 2025 12:36:58 +0000 https://maaymarathi.com/?p=4415 Home Loan घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. होम लोन तुमच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक निर्णयांपैकी एक आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घेण्याआधी योग्य तयारी केली पाहिजे. खाली दिलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला होमलोन घेण्यापूर्वी लक्षात घेणं आवश्यक आहे.

व्याज दर :
लोन घेताना बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला व्याज दर देतात. तर हा व्याज दर दोन प्रकारचा असू शकतात. एक म्हणजे फिक्स्ड (स्थिर)दर किंवा फ्लोटिंग (चल) दर असू शकतात. फिक्स्ड दर म्हणजे हा दर कर्जाच्या कालावधी पर्यंत स्थिर राहतो. फ्लोटिंग दर आणि हा दर वेळोवेळी बदलतो, म्हणजे कधी कमी, कधी जास्त होऊ शकतो. तुमच्या बजेटला अनुरूप असलेला व्याज दर तुम्ही निवडा. फ्लोटिंग दर कमी असू शकतो, पण तो बदलत राहील, तर फिक्स्ड दर स्थिर राहतो.

तुमचा आर्थिक प्लॅन:
कर्ज घेताना, भविष्यातील आर्थिक खर्च लक्षात ठेवा. ह्याचा उद्देश असा की तुमच्या आर्थिक स्थितीला याच्या वाईट परिणामांपासून वाचवता येईल. घर खरेदीच्या बाबतीत, तुमच्या दीर्घकालीन कर्जाची परतफेड तुमच्या आर्थिक स्थितीला अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.

कर्जाची परतफेडीची वेळ :
तुम्ही कर्ज किती कालावधी साठी घेत आहात यासाठी संपूर्णपणे सुनियोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये दोन प्रकार आहे एक म्हणजे लहान कालावधी आणि दुसरं म्हणजे दीर्घकालीन कालावधी. जर तुम्ही लहान कालावधी ठेवत असाल तर तुम्ही दीर्घकाळापर्यंत कर्जाच्या हिशोबात अडकाल आणि जर तुम्ही दीर्घकालीन कालावधी घेतला तर तुम्ही लवकरात लवकर कर्ज मुक्त होऊ शकता.

विमा :
होम लोन घेताना, तुम्हाला काही बँका घर कर्जावर प्रोपर्टी इन्शुरन्स किंवा लाइफ इन्शुरन्स घेण्याची शिफारस करू शकतात. ह्याचा उद्देश घर किंवा तुमचं जीवन सुरक्षित ठेवणं आहे. त्यामुळे काही भेडणारी परिस्थिती घडल्यास कर्जाची परतफेड चालू राहू शकेल.

EMI कसा ठेवायचा?:
EMI म्हणजे तुम्हाला दर महिना जो हप्ता भरावा लागतो. तुम्ही तुमच्या महिन्याचे उत्पन्न आणि खर्चांचा योग्य विचार करा. EMI तुमच्या उत्पन्नाच्या ४०% पेक्षा जास्त न ठेवण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो.मासिक हप्त्याचा ओझा सहन करण्यासारखा असावा याची काळजी घ्या.

बॅंक किंवा संस्थेची विश्वासार्हता :
तुम्ही ज्या कोणत्या बँक मधून किंवा संस्थेकडून कर्ज काढत आहात त्याची विश्वासहर्ता तपासणे गरजेचे आहे. त्या संस्थेचा आणि बँकेचा इतिहास आणि ग्राहक सेवा लक्षात घेतल्यास तुमाला चांगला निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल.

क्रेडिट स्कोर:
तुमचा क्रेडिट स्कोर (CIBIL स्कोर) हा बँक कर्ज मंजूर करताना महत्त्वाचा घटक आहे. क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुमचे आधीचे कर्ज वेळेवर फेडणं, क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेत करणे आणि कर्ज उशीर न करणे हे महत्त्वाचे आहे.

कर्जाच्या अतिरिक्त शुल्कांची माहिती :
होम लोन घेताना कधीकधी काही अतिरिक्त शुल्क लागतात. जसे कि,
प्रोसेसिंग फी: कर्ज मंजूरी प्रक्रियेसाठी बँक घेत असलेला शुल्क.
पेनल फी: जर तुम्ही महिन्याचा हप्ता वेळेवर न भरला तर बँक अतिरिक्त शुल्क आकारू शकते.
सर्विस चार्जेस: काही बँका कर्जाच्या संपादनासाठी विविध सर्विस शुल्क घेतात.
या सर्व शुल्कांची माहिती तुम्हाला कर्ज घेणाऱ्याच्या आधी समजून घ्या.

लोन मंजुरी प्रक्रिया :
होम लोन मंजुरीसाठी बँक तुम्हाला काही कागदपत्रं विचारेल, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र, घराच्या किमतीची माहिती इत्यादी.
तुमचे सर्व कागदपत्र योग्य आणि पूर्ण असावेत याची नोंद घ्यावी. तसेच बँकेला किंवा संस्थेला तुमची कर्ज परत फेडण्याची ताकद तपासावी लागेल. त्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

]]>
https://maaymarathi.com/home-loan-taking-a-home-loan-so-make-sure-to-prepare-these-things-in-advance/feed/ 0
Home Loan : लोन कालावधी लांबवण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहितेय का? https://maaymarathi.com/home-loan-do-you-know-the-advantages-and-disadvantages-of-extending-the-loan-period/ https://maaymarathi.com/home-loan-do-you-know-the-advantages-and-disadvantages-of-extending-the-loan-period/#respond Thu, 20 Feb 2025 13:37:00 +0000 https://maaymarathi.com/?p=4392 Home Loan : तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक अडी अडचणी येत असतात आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक गरज भासू शकते, आणि त्यावर एक मार्ग म्हणजे लोन काढणे.
घरामध्ये अचानक येणारे खर्च असो वा आणखी काही आपण कोणाला पैसे मागण्यापेक्षा लोन घेणे जास्त प्रेफर करतो. प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार लोन परतफेड करण्याची काळजी घेत असतो. काहीवेळा लोन चा कालावधी लंबवण्याचा निर्णय घेतला जातो. पण याचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात. चला, या विषयावर सविस्तर चर्चा करूयात…

लोनचा कालावधी लांबवण्याचे फायदे –

कमी मासिक हप्ता –
मासिक हप्ता कमी ठेवल्याने तुम्हाला लोन परतफेडीसाठी पुरेसा वेळ मिळाला जातो. आणि यामुळे तुमच्या घरगुती खर्चांवरही फारसा असा बदल होत नाही. मासिक हप्त्याची रक्कम कमी असल्याने तुम्हाला इतर गोष्टींच्या खर्चांकडेहि लक्ष देणे शक्य होते.

आर्थिक ताण कमी होतो –
हप्त्यांची रक्कम कमी ठेवल्याने घरगुती खर्च करत असताना कोणताही आर्थिक ताण येत नाही. तुम्ही तुमच्या सोयी नुसार मासिक हप्ता ठरवलेला असतो त्यामुळे तुम्हाला त्याचे गणित समजून इतर खर्चांकडे हि पैसे गुंतवता येतात.

जास्त वेळ मिळतो –
लोनचा कालावधी वाढवून, तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. यामुळे तुमचे आर्थिक बजेट विस्कळीत होत नाही. आणि परतफेडीची वेळ जास्त असल्याने कोणत्याही प्रकारचे ओझे तुमच्या डोक्यावर राहत नाही.

लोनचा कालावधी लांबवण्याचे तोटे –

व्याज जास्त प्रमाणात भरावे लागेल –
लोनचा कालावधी वाढविल्यामुळे एकूण व्याज जास्त होईल. तुम्ही जास्त काळापर्यंत कर्ज फेडत राहिल्यात तर एकूण व्याजाची रक्कम जास्त होते. यामुळे लोन पूर्णपणे फेडण्यासाठी जास्त पैसे खर्च होऊ शकतात.

जास्त काळासाठी लोनचा ताण –
तुम्ही लोन परतफेडीसाठी जेवढा काळ वाढवाल तेवढाच ताण तुम्हाला इतर खर्च करताना जाणवणार आहे. यामुळे तुम्हाला नवे आर्थिक निर्णय घेणं किंवा नवीन लोन घेणं कठीण होऊ शकते.

कर्ज मुक्त होण्यास वेळ लागेल –
लोनच्या कालावधीला लांबवून, तुम्हाला कर्ज मुक्त होण्यासाठी जास्त वेळ लागेल. यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं कठीण होईल.
कोणत्याही गोष्टीसाठी खर्च करताना तुम्हाला सर्वात आधी हप्त्याचा विचार करावा लागेल.

लोनचा कालावधी लांबवण्याचा निर्णय घेताना त्याचे फायदे आणि तोटे दोन्हींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तात्काळ आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल, तर कालावधी लांबवणे फायदेशीर ठरू शकत नाही. पण, सगळ्याबाजू लक्षात घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.

]]>
https://maaymarathi.com/home-loan-do-you-know-the-advantages-and-disadvantages-of-extending-the-loan-period/feed/ 0
Home Loan : गृहकर्ज घेण्याचे फायदे माहित आहेत का? https://maaymarathi.com/home-loan-do-you-know-the-benefits-of-taking-a-home-loan/ https://maaymarathi.com/home-loan-do-you-know-the-benefits-of-taking-a-home-loan/#respond Mon, 17 Feb 2025 14:19:00 +0000 https://maaymarathi.com/?p=4354 Home Loan : गृहकर्ज घेणे घर खरेदी करण्यासाठी एक सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे, ज्यामुळे आपल्याला घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम लगेच मिळते. गृहकर्जाचे फायदे म्हणजे आपण घर आपल्याला हवे असे खरेदी करू शकतो, जे एकदम मोठ्या रकमेच्या आधारावर शक्य नसले तरी, बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देतात आणि आपण त्या कर्जाची परतफेड दरमहा छोटे हप्ते भरून हि करू शकतो. यावर आपल्याला कर सवलत मिळू शकते आणि घर भविष्यात एक स्थिर संपत्ती बनू शकते. पण याचे काही तोटे देखील आहेत. जर आपण कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही, तर आपले घर गमावण्याचा धोका असतो. व्याज दर बदलू शकतो, त्यामुळे आपला मासिक हप्ता वाढू शकतो. कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर आणि आपले उत्पन्न बघून कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे, गृहकर्ज घेताना योग्य आर्थिक नियोजन आणि परतफेडीची जबाबदारी असते. जर आपण फायदे आणि मर्यादा समजून घेतले, तर गृहकर्ज एक चांगला पर्याय ठरू शकतो.

गृहकर्ज घेणे हा घर खरेदी करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. जेव्हा आपल्याला स्वतःचे घर खरेदी करायचे असतं, तेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात. अशा वेळी गृहकर्ज घेणे उपयोगी पडते. चला जाणून घेऊ गृहकर्ज घेण्याचे फायदे आणि मर्यादा :

गृहकर्जाचे फायदे

1. घर खरेदी सुलभ होते
गृहकर्जामुळे आपण आपल्याला हव्या असणाऱ्या घराची खरेदी करू शकतो. एका वेळेस एवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य होत नाही परंतु घर कर्जामुळे आपण हप्त्यांमार्फत ती रक्कम देऊ शकतो.

2. सव्वाशेतील कर्ज भरताना परतफेडीची सोय
गृहकर्ज सामान्यतः दीर्घकालीन असते (20-30 वर्षे), त्यामुळे दरमहा आपल्याला कमी रक्कम परत करावी लागते. यामुळे तुमच्या मासिक बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या व्यत्ययाचा सामना करत नाही.

  1. कर भरण्यात सूट
    गृहकर्ज घेणाऱ्यांना कर भरताना फायदा होतो. पॅनल्स किंवा आयटी एक्पेंसमधून कर्ज परतफेडीवर सूट मिळू शकते, ज्यामुळे करांची बचत होऊ शकते.
  2. समृद्ध भविष्यासाठी बचत
    गृहकर्जाने आपल्याला एक घर मिळवण्याचा मार्ग उघडला आहे, ज्यामुळे भविष्यकाळात आपली एक मजबूत संपत्ती बनू शकते. हे घर तुम्हाला दीर्घकाळाकरिता एक स्थिर संपत्ती प्रदान करेल.
  3. कमी दरात कर्ज
    घरांवर गृहकर्ज घेण्याचे दर अन्य कर्जाच्या तुलनेत कमी असतात. ज्यामुळे आपल्याला एक सुलभ कर्ज फेडण्याची संधी मिळते.

गृहकर्जाची मर्यादा

  1. कर्ज फेडीचा ताण
    गृहकर्ज घेतल्यावर दरमहा काही रक्कम कर्जाची परतफेड करावी लागते. यामुळे काही वेळेस आर्थिक ताण येऊ शकतो, विशेषतः आपलं उत्पन्न वाढत नसल्यावर
  2. व्याजाची वाढ
    गृहकर्जाच्या व्याजदरात चढउतार होऊ शकतो. जर व्याज दर वाढला, तर तुमची कर्जाची परतफेड वाढू शकते. त्यामुळे घराच्या किमतीसोबत कर्जाचे टोक अधिक होऊ शकते.
  3. कर्जाची जोखीम
    गृहकर्ज न फेडल्यास, घर गमावण्याचा धोका असतो. बँक किंवा कर्जदार आपल्याला कर्ज फेडण्यासाठी वेळ देतात, पण अनेक वेळा कर्ज न फेडल्यास घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.
  4. उधारी वाढवणे
    काही लोक गृहकर्ज घेऊन त्यांच्या इतर खर्चांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, ज्यामुळे कर्जाची उधारी वाढू शकते. यामुळे त्यांना जास्त काळ कर्ज फेडायला अडचण येऊ शकते.
  5. कर्ज घेण्याची पात्रता
    गृहकर्ज घेण्यास काही नियम आणि शर्ता असतात. आपल्याला चांगली क्रेडिट स्कोअर, स्थिर नोकरी आणि निश्चित उत्पन्न असणे आवश्यक असते. हे नसल्यास काही लोक कर्ज घेऊ शकत नाहीत.

गृहकर्ज घेणे हा एक फायदेशीर पर्याय असू शकतो, विशेषतः जेव्हा तुम्हाला घराची खरेदी करायची असेल, पण त्याचबरोबर त्याची मर्यादाही लक्षात घेतली पाहिजे. कर्ज घेणाऱ्याने त्याच्या परतफेडीची योजना नीट केली पाहिजे आणि त्याच्या आर्थिक स्थितीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले पाहिजे.

अडीच लाखांचं अनुदान: केंद्र सरकारने “प्रधानमंत्री आवास योजना” सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पहिल्या घरासाठी गृहकर्ज घेणाऱ्यांना २.६७ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. या योजनेत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आणि अल्प उत्पन्न गटाच्या लोकांना गृहकर्जावर ६.५% व्याजदर सवलत मिळते, ज्यांची कर्ज रक्कम १२ लाखांपर्यंत आहे. मध्यम उत्पन्न गटात (१२ लाख ते १८ लाख दरम्यान) असणाऱ्यांना ४% ते ३% पर्यंत सूट मिळते.

स्वस्त व्याजदर: सध्या बँकांमध्ये गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे व्याजदर ८.५% ते ९.५% दरम्यान आहेत, तर सहकारी बँकांचे व्याजदर ९.५०% ते १४.२४% असतात. सहकारी बँकांचे दर थोडे जास्त असले तरी, ग्राहक त्यांच्याकडून गृहकर्ज घेतात. याचे कारण दोन मुख्य गोष्टी आहेत – तांत्रिक अडचणीमुळे इतर बँकांकडून गृहकर्ज न मिळणे आणि सहकारी बँकांशी असलेलं आपुलकीचं नातं.

]]>
https://maaymarathi.com/home-loan-do-you-know-the-benefits-of-taking-a-home-loan/feed/ 0