LawEnforcement – माय मराठी https://maaymarathi.com Mon, 02 Jun 2025 08:16:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png LawEnforcement – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Pen : लपून बसलेल्या बांगलादेशी नागरिकांना पेण पोलिसांकडून अटक ! https://maaymarathi.com/pen-bangladeshi-citizens-who-were-hiding-were-arrested-by-pen-police/ https://maaymarathi.com/pen-bangladeshi-citizens-who-were-hiding-were-arrested-by-pen-police/#respond Mon, 02 Jun 2025 08:16:11 +0000 https://maaymarathi.com/?p=5970 अरविंद गुरव, (Pen)

पेण (Pen) पोलीस ठाणे हद्दीतील मौजे तरणखोप गावात काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पेण पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली.

पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता, दोन बांगलादेशी नागरिक मौजे तरणखोप गावातील अमृत बेकरीजवळील मोहन सखाराम पाटील यांच्या चाळीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले.

चौकशीत त्यांनी बांगलादेशी असल्याची कबुली दिली असून, आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

  1. जसिमोद्दीन अबुल कासिम काझी, वय ४९ वर्ष
  2. लिली खातून खुरशीद अली, वय ४३ वर्ष
    (मूळ गाव – बगुरा, पो. अभयपूर, जिल्हा झेणाईदा, बांगलादेश)

यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२५ नुसार परकीय नागरिक अधिनियम १९४६ चे कलम १४, परकीय नागरिक आदेश १९४८ नियम ३(१) आणि पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९६० चे नियम ३ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे आणि त्यांच्या पथकाने केली.

तक्रार पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी पेण पोलीस ठाण्यात नोंदवली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत.

]]>
https://maaymarathi.com/pen-bangladeshi-citizens-who-were-hiding-were-arrested-by-pen-police/feed/ 0