petrol price hike – माय मराठी https://maaymarathi.com Thu, 27 Mar 2025 08:23:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png petrol price hike – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Price Hike:मधूमेह, कॅन्सरग्रस्तांना धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची दरवाढ? https://maaymarathi.com/price-hike-government-medicines-shocks-diabetics-and-cancer-patients/ https://maaymarathi.com/price-hike-government-medicines-shocks-diabetics-and-cancer-patients/#respond Thu, 27 Mar 2025 08:22:39 +0000 https://maaymarathi.com/?p=5205 देशात लवकरच कॅन्सर, डायबिटीज, हृदयाशी संबंधित आजार आणि अँटीबायोटिक्स औषधांच्या किंमती वाढण्याची (Price Hike) शक्यता व्यक्त होत आहे. सरकारी नियंत्रण असलेल्या या औषधांच्या किंमतीत साधारण 1.7 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा परिणाम दोन ते तीन महिन्यांनी जाणवू शकतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे तीन महिन्यांचा स्टॉक आधीच केलेला असतो. त्यामुळे आता जरी औषधांच्या किंमती वाढल्या तरी जोपर्यंत हा स्टॉक संपत नाही तोपर्यंत या दरवाढीचा परिणाम जाणवणार नाही.

बिजनेस टुडेच्या रिपोर्टनुसार ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्टचे (AIOCD) महासचिव राजीव यांनी याबाबत माहिती दिली. कच्चा माल आणि अन्य प्रकारच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. यामुळे फार्मा इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळणार आहे, असे राजीव यांनी सांगितले.

केमिकल आणि फर्टिलायझर संबंधी संसदेच्या स्थायी समितीनुसार फार्मा कंपन्यांवर दरवाढ आणि नियमांच्या उल्लंघनाचे आरोप अनेकदा झाले आहेत. राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण एक रेग्यूलेटरी बॉडी आहे. या बॉडीच्या माध्यमातून औषधांच्या किंमती निश्चित केल्या जातात. एनपीपीएनुसार 307 प्रकरणांत फार्मा कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.

NPPA ड्रग प्राइस कंट्रोल (DPCO) 2013 अंतर्गत औषधांची जास्तीत जास्त किंमत निश्चित केली जाते. सर्व औषध निर्माते आणि विक्रेत्यांना या किंमतीतच औषधे विक्रीचे निर्देश आहेत. यावर्षी बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी 36 लाइफ सेव्हिंग ड्रग्सवरुन कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली होती.

अर्थमंत्री सितारामन यांनी सांगितले होते की कॅन्सर, दुर्मिळ आजार आणि अन्य गंभीर आजारांनी पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 36 प्रकारच्या लाइफ सेव्हिंग औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता कॅन्सर, मधूमेह आणि हृदयरोगाशी संबंधित औषधांच्या दरवाढीची शक्यता व्यक्त होत आहे. या आजारातील रुग्णांना औषधांची नितांत आवश्यकता असते. पण आता जर दरवाढ झाली तर रुग्णांना मोठा झटका बसणार आहे.

]]>
https://maaymarathi.com/price-hike-government-medicines-shocks-diabetics-and-cancer-patients/feed/ 0
Petrol Diesel Prices : टाकी फुल करण्याआधी वाचा महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर https://maaymarathi.com/petrol-diesel-prices-read-before-filling-up-the-tank-new-petrol-and-diesel-prices-in-maharashtra/ https://maaymarathi.com/petrol-diesel-prices-read-before-filling-up-the-tank-new-petrol-and-diesel-prices-in-maharashtra/#respond Fri, 21 Mar 2025 06:47:43 +0000 https://maaymarathi.com/?p=5030 महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर झाले आहेत. आज, २१ मार्च २०२५ रोजी, इंधनाच्या किमतीत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह काही प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या चढ-उतारांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील इंधन दर थोडेसे वाढले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे.

आजच्या घडीला, महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईत पेट्रोल ₹103.50 प्रति लिटर तर डिझेल ₹90.03 प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल ₹104.28 आणि डिझेल ₹90.91 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. नागपूरमध्ये पेट्रोल ₹104.02 आणि डिझेल ₹90.74 आहे, तर नाशिकमध्ये पेट्रोल ₹104.75 आणि डिझेल ₹90.40 आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल ₹104.53 तर डिझेल ₹91.68 आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल ₹104.75 आणि डिझेल ₹91.30 आहे, ठाण्यात पेट्रोल ₹103.70 आणि डिझेल ₹90.42 आहे, तर साताऱ्यात पेट्रोल ₹105.16 आणि डिझेल ₹91.24 दराने विकले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून असतात. तेल कंपन्या (IOCL, BPCL, HPCL) दररोज बाजाराचा आढावा घेऊन नवीन दर निश्चित करतात. या किमती दररोज सकाळी जाहीर केल्या जातात आणि त्यानुसार स्थानिक पातळीवर इंधनाचे दर लागू होतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर सतत बदलत असतात आणि यावर स्थानिक कर आणि वाहतूक खर्चाचाही परिणाम होतो.

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घरबसल्या सहज तपासू शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) ग्राहकांनी “RSP <शहर कोड>” टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवावा. BPCL ग्राहकांनी “RSP <शहर कोड>” टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवावा, तर HPCL ग्राहकांनी “HPPprice <शहर कोड>” टाइप करून 9222201122 वर एसएमएस पाठवावा. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या इंधनाच्या किमती जाणून घेता येतात, ज्यामुळे इंधन भरण्यापूर्वी योग्य नियोजन करता येते.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती सतत बदलत असल्यामुळे, गाडी भरण्यापूर्वी दर तपासणे गरजेचे आहे. जर तुम्हाला दररोजच्या बदलांबद्दल अपडेट मिळवायचा असेल, तर वरील एसएमएस सेवा किंवा पेट्रोल पंपावरील दरफलक तपासू शकता. त्यामुळे तुम्ही बाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या आणि इंधन भरताना योग्य नियोजन करा.

]]>
https://maaymarathi.com/petrol-diesel-prices-read-before-filling-up-the-tank-new-petrol-and-diesel-prices-in-maharashtra/feed/ 0
Price Hike Impact:उन्हाळ्यात बसणार महागाईच्या झळा? https://maaymarathi.com/price-hike-impact-will-inflation-in-summer/ https://maaymarathi.com/price-hike-impact-will-inflation-in-summer/#respond Sat, 15 Mar 2025 12:58:39 +0000 https://maaymarathi.com/?p=4890 धुळवडीलाच महागाईने डोके वर काढले आहे. धुळवडीला सोने आणि चांदीच नाही तर दैनंदिन गरजेच्या वस्तूमध्ये पण मोठी वाढ (Price Hike Impact) झाली आहे. मटण आणि चिकनचे भाव गेल्यावर्षी पेक्षा मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे दुधाच्या किंमतींना पण दरवाढीची उकळी फुटली आहे. त्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली आहे. घरातील शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. इतके दर वधारले आहेत.

बर्ड फ्लूच्या सावटामुळे कोंबडीकडे पाठ

मुंबईत मटण ८०० ते ८५० रुपये किलो इतके झाले. प्रती किलोमागे ५० ते १०० रुपये वाढ झाली. ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये सुद्धा मटण आणि चिकनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे काल दिसून आले. काल नालासोपारासह विविध शहरात मटण खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी रांग दिसून आली. धुळवडीच्या दिवशी तिखट जेवणावळीचा बेत आखलेल्या अनेक मांसाहारींना मटण खरेदीसाठी प्रति किलो ८५० रुपये मोजावे लागले. अनेकांनी बर्ड फ्लूच्या सावटामुळे कोंबडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी मुंबईत मटणाच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे मटणाच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली.

शेळी पालनाऐवजी फळ आणि पालेभाज्यांची पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. शेळी पालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची होणारी विक्री, मागणीच्या तुलनेत कमी झालेला पुरवठा, तसेच काही भागात पसरलेली बर्ड फ्लूची साथ अशा विविध कारणांमुळे मटणाची मागणी वाढल्याचे समोर आले आहे. मागणी वाढल्याने मग दुकानदारांनी मटणाच्या किंमती वाढवल्या. त्यामुळे ग्राहकांना मटण ८०० ते ८५० रुपये किलो दराने विकत घ्यावे लागले.

दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ

मटणच नाही तर आजपासून सर्व दूध केंद्रावर दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईसस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे.

नवी दरवाढ आज, शनिवारपासून लागू होणार आहे. पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. गाय आणि म्हशीच्या दूध दरात या बैठकीत प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकर्‍यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.

]]>
https://maaymarathi.com/price-hike-impact-will-inflation-in-summer/feed/ 0