skin care tips – माय मराठी https://maaymarathi.com Fri, 21 Mar 2025 07:40:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png skin care tips – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Skin Tags : स्किन टॅग कायमचा रामबाण इलाज – घरीच करा सोपी ट्रीटमेंट https://maaymarathi.com/skin-tags-permanent-cure-for-skin-tags-easy-treatment-at-home/ https://maaymarathi.com/skin-tags-permanent-cure-for-skin-tags-easy-treatment-at-home/#respond Fri, 21 Mar 2025 07:40:09 +0000 https://maaymarathi.com/?p=5034 त्वचेवर लहान, मऊ, मांसल गाठी आल्याचे तुम्ही कधी अनुभवले आहे का? यालाच स्किन टॅग (Skin Tags) म्हणतात. या गाठी साधारणतः वेदनारहित आणि निरुपद्रवी असतात, परंतु काही लोकांना त्या दिसायला विचित्र वाटू शकतात किंवा त्रासदायक वाटू शकतात. चला, स्किन टॅग म्हणजे काय, त्याची कारणे, घ्यायची काळजी आणि उपचार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

स्किन टॅग म्हणजे काय?
स्किन टॅग ही त्वचेवर तयार होणारी एक लहान मांसल गाठ असते. ही गाठ त्वचेशी संलग्न असते आणि हलक्या थराने त्वचेपासून बाहेर आलेली असते. स्किन टॅग बहुतेक वेळा मऊ आणि लवचिक असतात आणि रंगाने त्वचेप्रमाणेच किंवा किंचित गडद असतात. साधारणतः ही समस्या आरोग्यासाठी हानिकारक नसते, परंतु काही वेळा घासल्यामुळे किंवा दाबामुळे त्रासदायक ठरू शकते.

स्किन टॅग होण्याची प्रमुख कारणे

  • घर्षण आणि घाम – ज्या भागांवर वारंवार घासले जाते, जसे की मान, बगल, जांघा, डोळ्यांच्या आसपास, स्तनाखाली, हे ठिकाणे स्किन टॅगसाठी अधिक संवेदनशील असतात.
  • लठ्ठपणा आणि वजन वाढ – वजन वाढल्यामुळे त्वचेमध्ये घर्षण होते आणि त्यामुळे स्किन टॅग होण्याची शक्यता जास्त असते.
  • हार्मोनल बदल – गर्भधारणेदरम्यान किंवा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हार्मोनल बदलांमुळे स्किन टॅग दिसून येऊ शकतात.
  • आनुवंशिकता – काही कुटुंबांमध्ये स्किन टॅग वारसा म्हणूनही होऊ शकतात.
  • वय आणि त्वचेचे नैसर्गिक बदल – वय वाढल्यावर त्वचेमध्ये बदल होतात, ज्यामुळे स्किन टॅगची संख्या वाढू शकते.

स्किन टॅग काढण्यासाठी घरगुती उपाय

ऍपल सायडर व्हिनेगर हा एक प्रभावी उपाय आहे. कापसाच्या बोळ्यावर ऍपल सायडर व्हिनेगर लावून स्किन टॅगवर हलक्या हाताने चोळा. काही दिवसांनी तो कोरडा पडून गळून पडतो. लिंबाच्या रसामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे लिंबाचा रस दररोज लावल्यास स्किन टॅग कमी होण्यास मदत होऊ शकते. बेकिंग सोडा आणि कैस्टर ऑइल यांचे मिश्रण तयार करून नियमित लावल्यास स्किन टॅग कोरडे पडतात आणि गळून जातात. तसेच, कोमट पाण्याने दिवसातून दोन वेळा प्रभावित भाग धुतल्यास त्वचा मऊ होते आणि स्किन टॅग वेगाने गळतो.

वैद्यकीय उपचार पद्धती

क्रायोथेरपी (Cryotherapy) ही एक पद्धत आहे ज्यामध्ये द्रव नायट्रोजनचा वापर करून स्किन टॅग गोठवले जातात आणि काही दिवसांत ते आपोआप गळून पडतात. इलेक्ट्रोकॉटरी (Electrocautery) मध्ये विद्युत प्रवाहाचा वापर करून स्किन टॅग नष्ट केला जातो. सर्जिकल काढणी (Excision) पद्धतीत डॉक्टर लहान ब्लेड किंवा कात्रीच्या मदतीने स्किन टॅग काढून टाकतात. याशिवाय, लेझर उपचाराद्वारे अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून स्किन टॅग सहजपणे नष्ट करता येतो.

स्किन टॅग होऊ नयेत यासाठी घ्यायची काळजी

नेहमी त्वचा स्वच्छ ठेवा आणि ओलसरपणा टाळा. सैलसर कपडे परिधान करा, जेणेकरून घर्षण कमी होईल. जास्त तेलकट आणि साखरयुक्त आहार कमी करा, कारण यामुळे हार्मोनल बदल होऊ शकतात. लठ्ठपणा नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम करा. त्वचेवर कोणतेही बदल आढळल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

स्किन टॅग सामान्यतः हानिकारक नसतात आणि आरोग्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. मात्र, जर ते वारंवार दुखत असतील, रक्तस्त्राव होत असेल किंवा दिसायला विचित्र वाटत असतील, तर ते काढून टाकण्यासाठी उपाय करता येतात. घाबरण्याची गरज नाही, कारण हे सहजपणे घरगुती उपायांद्वारे किंवा वैद्यकीय पद्धतींनी काढता येतात. जर तुमच्या त्वचेवर अशा प्रकारच्या लहान गाठी असल्यास, योग्य काळजी घेऊन त्यांच्याशी कसे वागायचे हे समजून घेणे गरजेचे आहे.

]]>
https://maaymarathi.com/skin-tags-permanent-cure-for-skin-tags-easy-treatment-at-home/feed/ 0
Beauty Tips : उन्हामध्ये चेहरा रखरखीत वाटतोय? आणि डेड स्किन जाणवतेय? तर हे घरगुती उपाय करून पहा https://maaymarathi.com/beauty-tips-does-your-face-feel-dry-in-the-summer-and-do-you-feel-dead-skin-then-try-these-home-remedies/ https://maaymarathi.com/beauty-tips-does-your-face-feel-dry-in-the-summer-and-do-you-feel-dead-skin-then-try-these-home-remedies/#respond Sat, 22 Feb 2025 11:25:44 +0000 https://maaymarathi.com/?p=4439 उन्हामध्ये चेहरा रखरखीत वाटतोय? आणि डेड स्किन जाणवतेय? तर हे घरगुती उपाय (Beauty Tips) करून पहा
उन्हाळ्यात तासभर बाहेर राहिल्यानंतर किंवा अधिक उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि डेड होऊ शकते. त्यासाठी काही घरगुती लेप आणि उपाय वापरून त्वचेला आराम देणे, हायड्रेट करणे आणि ताजेपण मिळवणे गरजेचे आहे. या उपायांनी त्वचेला निसर्गिक पोषण मिळते आणि चेहरा एकदम चकचकीत दिसू लागतो. खाली दिलेल्या काही घरगुती उपायांनी तुम्ही त्वचा सौम्य आणि हायड्रेटेड ठेवू शकता.

दही आणि हळद : एका वाटीमध्ये २ चमचे हळद, आणि ३ ते ५ चमचे दही मिसळून तो लेप चेहऱ्यावर १५ ते २० मिनिट पर्यंत ठेवावा. यामुळे चेहऱ्याला एक उजाळा येईल आणि दही मुळे चेहरा थंड पडण्यास मदत होईल.

ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन ई तेल : १ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन ई तेल याचं मिश्रण तयार करून घ्या आणि त्याचा लेप तुमच्या चेहऱ्याला साधारणपणे १० ते १५ मिनिट पर्यंत लावून ठेवा या मिश्रणाचा वापर त्वचेला सॉफ्ट आणि हायड्रेटेड ठेवतो. हे ऑईल त्वचेतील पाणी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेला ताजेपण देण्यासाठी मदत करते.

बेसन आणि दूध : बेसन पिठामध्ये आवश्यक एवढं दूध टाकून ते मिश्रण तयार करून घ्या. आणि १५ ते २० मिनिट पर्यंत ते चेहऱ्याला लावून ठेवा. यानी चेहऱ्यावर एक नवा ग्लो येतो आणि चेहरा स्वच्छ होऊन जातो.

गुलाब जल आणि ताज्या काकडीचा रस : ताज्या काकडीच्या रसामध्ये ५ ते ६ ड्रॉप गुलाब जल टाकून ते मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा. यांनी चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल तसेच त्वचेमध्ये एक सौम्यपणा जाणवेल.

संत्रीची साल, दूध आणि हळद : संत्रीची साल उन्हात वाळवून त्याची पावडर टायर करून घ्यायची. त्यामध्ये १ चमचा हळद आणि जेवढं पात्तळ हवे असेल तेवढं दूध घालून ते मिश्रण चेहऱ्याला लावावे. संत्रीच्या सालीमुळे व्हिट्यामिन सी त्वचेला मिळाले जाते. आणि हळद, दूध तर आपल्या चेहऱ्यासाठी उपयुक्तच असते.

आंबी हळद आणि मध : रात्री झोपण्यापूर्वी आंबी हळद आणि मध याचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा मऊ पडतो आणि डार्क सर्कल्स किंवा डाग कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.

बिट आणि तूप : ताज्या बीटच्या रसामध्ये अगदी २ ते ३ छोटे चमच तूप टाकून ते चेहऱ्याला लावा यानी चेहऱ्याला ग्लो येईल आणि तुपानी चेहरा सौम्य होईल.

केळीची साल : केळीची साल चेहऱ्याला घासल्याने चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

हे सर्व बाहेरील उपाय झाले पण उन्हाच्या झळांचा त्रास रोखण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे पाणी जाणे देखील आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घेणे, पाणी असलेले फळं खाणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यात सब्जा आणि तुळशीची पाने टाकून पीत जा. यामुळे तुमच्या चेहऱ्यालाच नव्हे तर, केसांना देखील फायदे होऊ शकतात.

]]>
https://maaymarathi.com/beauty-tips-does-your-face-feel-dry-in-the-summer-and-do-you-feel-dead-skin-then-try-these-home-remedies/feed/ 0