Strict Action – माय मराठी https://maaymarathi.com Wed, 12 Mar 2025 14:03:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png Strict Action – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Kalyan : कल्याण-टिटवाळा परिसरात बेकायदा चाळींवर महापालिकेची धडक कारवाई https://maaymarathi.com/municipal-corporation-takes-strict-action-against-illegal-shanties-in-kalyan-titwala-area/ https://maaymarathi.com/municipal-corporation-takes-strict-action-against-illegal-shanties-in-kalyan-titwala-area/#respond Wed, 12 Mar 2025 14:03:30 +0000 https://maaymarathi.com/?p=4804 कल्याण (Kalyan) – टिटवाळा आणि बल्याणी भागातील तसेच डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी उभारल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६० बेकायदा चाळी आणि त्यांची बांधणी सुरू असलेल्या जोत्यांवर बुलडोझर चालवण्यात आला.

अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना बल्याणी भागात गुपचूप बेकायदा चाळी बांधल्या जात असल्याची माहिती मिळाली. तपासात असे समजले की, डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात आणि बल्याणी टेकडीवर ६० हून अधिक चाळींसाठी जोत्यांचे बांधकाम सुरू होते. यामुळे तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी महापालिका अधिकाऱ्यांसह तोडकाम पथक, जेसीबी मशीन आणि पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने भूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ माजली आणि ते पळून गेले.

रेशन धारकांसाठी मोठी बातमी, आता KYC करा …

बल्याणी टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि वनजमीन आहे. भूमाफियांनी या जमिनींवर कब्जा मिळवण्यासाठी चाळी उभारण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी आधी जोत्यांचे बांधकाम केले जात होते, जेणेकरून भविष्यात येथे चाळी उभारता येतील. या भागात अनेकजण जमीन हडप करण्यासाठी स्पर्धा करत होते, असे स्थानिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गेल्या दीड महिन्यापासून टिटवाळा, मांडा, अटाळी, मोहने परिसरात बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. या मोहिमेद्वारे सुमारे १५०० हून अधिक बेकायदा चाळी, जोते आणि व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. स्थानिकांच्या मते, टिटवाळ्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात आहे.

ही बेकायदा बांधकामे प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यावर उभी राहिली होती. मात्र, कारवाईला भीतीपोटी आता हे सर्व लोक गायब झाले आहेत. जो कोणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. बेकायदा बांधकामधारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याअंतर्गत (MRTP Act) गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

]]>
https://maaymarathi.com/municipal-corporation-takes-strict-action-against-illegal-shanties-in-kalyan-titwala-area/feed/ 0
KDMC : डोंबिवलीत RSS शाखेवर दगडफेक, पाच जण ताब्यात https://maaymarathi.com/kdmc-stones-pelted-at-rss-branch-in-dombivli-five-people-detained/ https://maaymarathi.com/kdmc-stones-pelted-at-rss-branch-in-dombivli-five-people-detained/#respond Tue, 11 Mar 2025 10:51:42 +0000 https://maaymarathi.com/?p=4766 डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक (KDMC) केल्याची घटना घडली. ही घटना रविवार रात्री ८ वाजता घडली, जेव्हा मुलांना प्रशिक्षण दिले जात होते. सुदैवाने, या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ही शाखा वीर सावरकर शाखा म्हणून ओळखली जाते आणि ती गेल्या तीन महिन्यांपासून शाखा अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे, जिथे मुलांना आणि इतरांना प्रशिक्षण दिले जाते.

या घटना नंतर स्थानिक टिळक नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या घटने नंन्तर सिसिटीव्ह च्या मदतीने पोलिसांनी तपास करून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटने मध्ये ताब्यात घेतलेल्या लोकांपैकी ४ जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर अली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. ही शाखा खुल्या मैदानात चालविली जाते. RSS शी संबंधित लोकांनी या दगडफेक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. डोंबिवली, जो ठाणे जिल्ह्यात RSS चा बालेकिल्ला मानला जातो, तिथे ही घटना घडली आहे.

]]>
https://maaymarathi.com/kdmc-stones-pelted-at-rss-branch-in-dombivli-five-people-detained/feed/ 0