Thakurli – माय मराठी https://maaymarathi.com Mon, 17 Mar 2025 17:04:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png Thakurli – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Dombivli News : डोंबिवलीमध्ये तणाव, आरएसएस कार्यकर्ते खूपच आक्रमक… काय आहे प्रकरण ? https://maaymarathi.com/dombivli-news-tension-in-dombivli-rss/ https://maaymarathi.com/dombivli-news-tension-in-dombivli-rss/#respond Mon, 17 Mar 2025 17:01:11 +0000 https://maaymarathi.com/?p=4941 डोंबिवलीतील (Dombivli News) आरएसएस शाखेवर दगडफेकीच्या घटनेनंतर आरएसएस कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले आहेत. डोंबिवलीतील अप्पा दातार चौकात आरएसएस कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर ही बैठक झाली आहे. यावेळी कार्यकर्ते आक्रमक होताना दिसून आले. येथे लहान मुलांना शिकवले जात असताना दगडफेक झाली. या घटनेनंतर काल अप्पा दातार चौकात बैठक झाली. या बैठकीत सर्व आर्थिक व्यवहार फक्त हिंदू व्यापाऱ्यांशीच करावेत अशा सूचना देण्यात आल्या. अल्पसंख्याकांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यामुळे डोंबिवलीत तणावाचे वातावरण दिसून येत आहे आणि पोलिस प्रशासन सतर्क आहे.

काय आहे सदर घटना ?

डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक (KDMC) केल्याची घटना घडली. ही घटना मागच्या आठवड्यात रविवार रात्री ८ वाजता घडली, जेव्हा मुलांना प्रशिक्षण दिले जात होते. सुदैवाने, या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या घटना नंतर स्थानिक टिळक नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या घटने नंन्तर सिसिटीव्ह च्या मदतीने पोलिसांनी तपास करून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटने मध्ये ताब्यात घेतलेल्या लोकांपैकी ४ जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. ही शाखा खुल्या मैदानात चालविली जाते. RSS शी संबंधित लोकांनी या दगडफेक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. डोंबिवली, जो ठाणे जिल्ह्यात RSS चा बालेकिल्ला मानला जातो, तिथे ही घटना घडली आहे.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-news-tension-in-dombivli-rss/feed/ 0
Thakurli: ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा; आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश https://maaymarathi.com/thakurli-the-way-for-the-remaining-work-of-thakurli-flyover-is-clear-mla-ravindra-chavans-efforts-are-successful/ https://maaymarathi.com/thakurli-the-way-for-the-remaining-work-of-thakurli-flyover-is-clear-mla-ravindra-chavans-efforts-are-successful/#respond Thu, 30 Jan 2025 09:10:59 +0000 https://maaymarathi.com/?p=4102 Thakurli: डोंबिवली (शंकर जाधव) भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स वा जोशी शाळेसमोरच्या उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या पुलाने बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने गुरुवार 30 रोजी दुपारी अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे. त्या पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे आमदार चव्हाण म्हणाले.

]]>
https://maaymarathi.com/thakurli-the-way-for-the-remaining-work-of-thakurli-flyover-is-clear-mla-ravindra-chavans-efforts-are-successful/feed/ 0