VoterAwareness – माय मराठी https://maaymarathi.com Wed, 21 May 2025 13:55:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png VoterAwareness – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 G S mahanagar bank: मा. ना. आनंदराव अडसूळ सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे उमेदवारांची सदिच्छा भेट घेत पाठिंबा दर्शविला https://maaymarathi.com/g-s-mahanagar-bank-hon-mr-anandrao-adsul-solicitor-gulabrao-shelke-met-the-candidates-of-the-founding-panel-and-expressed-support/ https://maaymarathi.com/g-s-mahanagar-bank-hon-mr-anandrao-adsul-solicitor-gulabrao-shelke-met-the-candidates-of-the-founding-panel-and-expressed-support/#respond Wed, 21 May 2025 11:09:26 +0000 https://maaymarathi.com/?p=5853 अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तसेच राज्य बँक (G S mahanagar bank)  कर्मचारी युनियनचे अध्यक्ष ना. आनंदराव अडसूळ साहेब यांनी सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे उमेदवारांची सदिच्छा भेट घेत त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या. अडसूळ साहेब व सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचे मैत्रीपूर्ण आणि स्नेहपूर्ण संबंध होते.

नुकत्याच जाहीर झालेल्या जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अडसूळ साहेबांनी स्वर्गीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवला. यावेळी पॅनलच्या नेतृत्वकर्त्या गीतांजलीताई उदयराज शेळके यांना त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी पाठिंबा जाहीर केला.

यावेळी अडसूळ साहेबांनी जीएस महानगर बँकेच्या सर्व सभासदांना आवाहन केले की, संस्थापक पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, जेणेकरून बँकेचा विकास आणि पारदर्शक कारभार पहिल्यापेक्षा अधिक जोमाने आणि प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल.

प्रचाराचा नारळ फोडला

जी.एस. महानगर सहकारी बँक लिमिटेड, (G S mahanagar bank) मुंबईच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि चुरस पाहायला मिळत आहे. जी.एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्व. उदयराव शेळके यांच्या पत्नी गीतांजलीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने आज मुंबईतील काॅटनग्रीन येथील राम मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. तसेच लालबागचा राजाच्या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतले. लालबाग परिसरातील सर्व व्यापारी वर्गाशी यावेळी भेटीगाठी झाल्या. तसेच लालबागचा राजा मंडळाचे मा. सचिव सुधीर भाऊ साळवी हे देखील आपला पाठिंबा दर्शवत उपस्थित होते.

]]>
https://maaymarathi.com/g-s-mahanagar-bank-hon-mr-anandrao-adsul-solicitor-gulabrao-shelke-met-the-candidates-of-the-founding-panel-and-expressed-support/feed/ 0
Shivsena : भाजपा जिल्हाअध्यक्ष व शिवसेना आमदारांची भेट, पालिका निवडणुकीवर चर्चा? https://maaymarathi.com/shivsena-bjp-district-president-and-shivsena-mla-meet-discuss-municipal-elections/ https://maaymarathi.com/shivsena-bjp-district-president-and-shivsena-mla-meet-discuss-municipal-elections/#respond Sat, 17 May 2025 13:47:05 +0000 https://maaymarathi.com/?p=5825 डोंबिवली ( शंकर जाधव)

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका दहा वर्ष उलटली तरी पार पडल्या. प्रशासकीय राजवट असल्याने निवडणुका कधी होणार यावर राजकीत पक्षच नव्हे तर समान्य नागरिकांनी विचार पडला होता. आता या निवडणुका काही महिन्यात होण्याची शक्यता आल्याने महायुतीतील दोन पक्षानी महायुतीची सत्ता कशी येईल यावर चर्चा केली का? या बैठकीमागे नेमक काय राजकीय रणनीती आखली जातेय का? असा प्रश्न पडला आहे. शनिवार 17 तारखेला शिवसेना (Shivsena) डोंबिवली शहर शाखेत आमदार राजेश मोरे व भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदु परब यांची बैठक पार पडली. वास्तविक ही बैठक रविवार होणाऱ्या तिरंगा रॅलीच्या नियोजनाबाबत घेतली असली तरी त्या विषयाबरोबर पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली का असा प्रश्न कार्यकर्ते व नागरिकांना पडला आहे.

2022 साली महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंप होऊन शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आली. तर राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी शरद पवार यांचे कडे न राहता अजित पवार यांच्याकडे आली. राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे महायुती सरकार सत्तेत आले. मात्र राज्यात सत्ता आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही होत नव्हत्या. मुबंई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर पालिकेच्या निवडणूका काही वर्ष न झाल्याने प्रशासकीय राजवट आहे. आता या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्याने लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात महायुतीची सत्ता आली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपलीच सत्ता यावी याकरिता तिन्ही राजकीय पक्षानी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अशी चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब यांनी पदभार घेतल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यामुळे आता प्रत्येक शहरात निवडणुकीचे वातावरण रंगात आले आहे. ही पालिका निवडणूक महायुती व महाआघाडी यांच्यातच खेळायची असे आराखडे बांधले जात आहेत. मात्र या निवडणुकीत आपापले उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व प्रकारची रणनीती वापरायची या सध्या नियमाची आठवण करून देण्यात आली असावी. या दोघांच्या भेटीमुळे महायुतीत ताबडतोब निवडणुकीच्या कामासाठी कार्यकर्ते लागतील असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शहरात विकास कामाचे भूमिपूजन करण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे येणारी पालिका निवडणूक रंगतदार होईल यात शंका नाही.

]]>
https://maaymarathi.com/shivsena-bjp-district-president-and-shivsena-mla-meet-discuss-municipal-elections/feed/ 0