भारतामध्ये भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील संबंध प्रामुख्याने Rent Agreement वर आधारित असतात. हा करार दोन्ही पक्षांसाठी बंधनकारक (Tenant Rights) असून, त्यामध्ये भाड्याची रक्कम, कालावधी, कराराची अटी आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. तथापि, अनेक वेळा घरमालक भाडेकरूंना कराराच्या मुदतीपूर्वीच घर सोडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे भाडेकरूंना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही वेळा, अनधिकृत वाढीव भाडे मागणे, डिपॉझिट परत न करणे, मूलभूत सोयीसुविधा बंद करणे अशा प्रकारच्या गोष्टी भाडेकरूंना सहन कराव्या लागतात.
यामुळे भाडेकरूंना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ११ महिने पूर्ण होण्यापूर्वी घर रिकामे करण्यास सांगणे कायदेशीर आहे का?, घरमालक कोणत्या परिस्थितीत घर रिकामे करण्यास सांगू शकतो?, आणि भाडेकरूंनी अशा परिस्थितीत कोणते कायदेशीर उपाय अवलंबावे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Rent Agreement म्हणजे काय?
भाडेकरू आणि घरमालक यांच्यात केलेला करार म्हणजे भाडेकरार (Rent Agreement). हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो, जो भाडेकरू आणि घरमालक दोघांसाठी बंधनकारक असतो. यात भाड्याचा कालावधी, मासिक भाडे, ठेव रक्कम (Deposit), देखभाल खर्च, तसेच दोन्ही बाजूंचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेले असतात.
११ महिन्यांच्या करारामागचे कारण काय?
बहुतांश भाडेकरार ११ महिन्यांसाठी केले जातात, कारण १२ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा करार अनिवार्यपणे नोंदणी करणे बंधनकारक असते. ११ महिन्यांचा करार Stamp Duty आणि Registration Fees वाचवण्यासाठी प्रचलित आहे. हा करार Indian Contract Act, 1872 अंतर्गत येतो आणि Maharashtra Rent Control Act, 1999 सारख्या राज्यनिहाय भाडेकरू कायद्यांनी नियंत्रित केला जातो.
कायदेशीर नियम आणि भाडेकरूंचे हक्क:
- जर भाडेकरारामध्ये कालावधी (Duration) स्पष्टपणे नमूद केला असेल, तर घरमालक ११ महिने पूर्ण होण्यापूर्वी भाडेकरूला घर सोडण्यास भाग पाडू शकत नाही.
- महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा, १९९९ आणि Transfer of Property Act, 1882 यांच्या अंतर्गत भाडेकरूंना संरक्षण दिले गेले आहे.
- जर घरमालक कराराच्या मुदतीपूर्वी भाडेकरूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो आणि भाडेकरू न्यायालयात दावा दाखल करू शकतो.
- भाडेकरूने जर करारानुसार सर्व अटींचे पालन केले असेल आणि तरीही घरमालक जबरदस्ती करत असेल, तर भाडेकरू स्थानिक पोलीस ठाणे किंवा Rent Control Authority कडे तक्रार करू शकतो.
- कोणत्याही परिस्थितीत, घरमालकाने कोणतेही बेकायदेशीर पद्धतीने वीज, पाणी किंवा मूलभूत सेवा बंद केल्यास, हे कायद्याने गुन्हेगारी कृत्य मानले जाते आणि त्यावर तातडीने तक्रार करता येते.
- भाडेकरारात मुदतपूर्वी घर रिकामे करण्याचा कोणताही कलम नसल्यास, घरमालकाला भाडेकरूला काढण्याचा अधिकार नाही.