Thakurli: ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा; आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

माय मराठी
1 Min Read

Thakurli: डोंबिवली (शंकर जाधव) भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स वा जोशी शाळेसमोरच्या उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या पुलाने बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने गुरुवार 30 रोजी दुपारी अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे. त्या पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे आमदार चव्हाण म्हणाले.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more