Titwala: कडेवर मूल, डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात टिटवाळ्यातील महिला

माय मराठी
1 Min Read

Titwala: डोंबिवली (शंकर जाधव) गेली पंधरा वर्ष पाणी टंचाईचा सामना करत पाण्यासाठी वनवण करणाऱ्या महिलांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. कडेवर मुल आणि डोक्यावर हंडा घेऊ पाण्यासाठी किती दिवस वनवण करावी लागणार असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.टिटवाळा इंद्रानगर साई दर्शन कॉलनीमधील चार ते पाच हजार कुटुंबियांची ही समस्या कधी दूर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिटवाळ्यातील इंद्रानगर परिसरात महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. कडेवर लहान मूल, डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या या महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत राहतात. पाणीपुरवठ्याचा अभाव असूनही नळाला पाणी येत नसले तरी महानगरपालिकेचे बिल मात्र या परिसरातील कुटुंबांना भरावे लागत आहे.येथील महिलांना पहाटे आपले काम आवरून पाण्याच्या शोधात निघावे लागत आहे या पूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने या परिसरातील कुटुंबीयांना बोरिंगच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. बोरिंगचे दूषित पाणी पिऊन परिसरातील मुलं, महिला आणि वयोवृद्ध गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. पंधरा वर्षांपासून पाण्याची समस्या कायम असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more