Urine Infection : पब्लिक टॉयलेट मध्ये जायला भीती वाटतेय? थांबा जाणून घ्या इन्फेकशन पासून वाचण्याचे काही टिप्स..
बऱ्याचदा आपण पाहतो. कुठे तरी लांब प्रवास करायच्या वेळी काहीजण जास्त पाणी पिणे टाळतात का तर, यूरीने इन्फेकशनचं प्रमाण वाढलेलं आहे.
काहीजण प्रवासाच्या वेळी जास्त पाणी पिणे टाळतात तर काहीजण अक्षरशः लघवी तुंबवून ठेवतात. पण हे करणे तुमच्या आरोग्यास घातक ठरू शकते. तर ह्याच सगळ्या समस्यांवर उपाय हवा असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
या समस्येवर मात करणे म्हणजेच पब्लिक टॉयलेट मध्ये जात असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ती काळजी कशी घ्यायची हे पाहुयात.
टॉयलेट सीट कव्हर किंवा टॉयलेट पेपरचा वापर करा.
सार्वजनिक शौचालयांमध्ये टॉयलेट सीटवर जर्म्स असू शकतात. त्यामुळे, टॉयलेट सीटवर थेट बसणे टाळा. त्याऐवजी टॉयलेट सीट कव्हर वापरा ते नसल्यास टॉयलेट पेपर लावून एक अंतर तयार करा. यामुळे तुम्ही जर्म्सपासून वाचू शकता.
हातानी सरफेसला स्पर्श करणे टाळा
शौचालयांमध्ये खूप लोक ये-जा करत असतात आणि त्यावर अनेक लोकांचा स्पर्श होतो. त्यामुळे, फ्लश बटन, नळ, आणि दाराच्या हँडल्सला हातांनी थेट स्पर्श करणे टाळा. शक्य असल्यास, टिश्यू वापरून या सरफेसला स्पर्श करा.
हात स्वच्छ न करणे
अनेक वेळा लोक शौचालय वापरल्या नंतर आपले हात योग्य रीतीने धुवत नाहीत. सार्वजनिक शौचालय वापरण्यानंतर हॅन्डवॉश आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे जर्म्स आणि इन्फेक्शन्सपासून वाचता येईल.
हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणे
पाणी कमी प्यायल्यामुळे प्रायव्हेट पार्ट मध्ये (urine area) इन्फेक्शन्स होऊ शकतात. मूत्रमार्गातील हानिकारक बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि इन्फेक्शन्स होण्याचा धोका कमी होतो.
You Might Also Like
जर हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल. तर घरगुती उपाय टाळून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.