Vastu Tips: भारतात आपण अनेकदा लोक त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याचे नाळ लटकवताना पाहतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी घोड्याची नाळ उलटी किंवा “U” आकारात लटकलेली दिसते. घराबाहेर घोड्याची नाळ ठेवण्याची प्रथा अनेक संस्कृतींमध्ये सामान्य आहे. विशेषतः भारतात आणि युरोपमध्ये. ही परंपरा धार्मिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक श्रद्धांवर आधारित आहे.
घराबाहेर घोड्याची नाळ ठेवण्याची पद्धत
U-आकार वरच्या दिशेने:- नाळ उलटी असावी, म्हणजेच “U” आकार वरच्या दिशेने असावी. यामुळे घरात नशीब, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. अशा प्रकारे घोड्याची नाळ लावल्याने घराची समृद्धी वाढते आणि ते आनंदाचे लक्षण आहे.
U-आकारात खालच्या दिशेने:- नाळ एका “U” आकारात (खाली वक्र) ठेवली जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. घराचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी हा उपाय उपयुक्त मानला जातो.
घराबाहेर घोड्याची नाळ ठेवण्याचे धार्मिक करणे :-
हिंदू धर्मानुसार, घोड्याची नाळ ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. घोड्याची लोखंडी नाळ नकारात्मक शक्तींचा प्रतिकार करून घरात सकारात्मक ऊर्जा आणते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ ठेवल्याने वाईट शक्ती आणि दुर्दैव घरात प्रवेश करू शकत नाहीत. नाळ उलट केल्याने “वाईट नजर” किंवा “अंधत्व” दूर होते असे हि मानले जाते. ही नाळ पाहिल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेमुळे होणारे नकारात्मक परिणाम दूर होतात. लोखंड हा शनिदेवाच्या प्रभावाखाली असलेला धातू आहे. शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळविण्यासाठी सुद्धा घोड्याची नाळ घालण्याची परंपरा आहे.
घराबाहेर घोड्याची नाळ ठेवण्याची वास्तूशास्त्रीय कारणे: –
You Might Also Like
वास्तुशास्त्रात, घराच्या उर्जेचा महत्त्वाचा प्रभाव असतो आणि घोड्याची नाळ घराच्या उर्जेचे संतुलन राखण्याचे काम करते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. नाळ घरात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते.
लोखंड हा एक स्थिर आणि मजबूत धातू आहे. म्हणून, ते घराच्या उर्जेचे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून संतुलन साधण्यास मदत करते. लोखंडी धातूची ऊर्जा घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकून शांती आणि स्थिरता प्रदान करते. वास्तुशास्त्रात घराची दिशा खूप महत्त्वाची आहे. मुख्य दरवाजाच्या दिशेबद्दल, घोड्याची नाळ दक्षिण आणि पश्चिम दिशांना ठेवणे चांगले, कारण या दिशा वाईट शक्ती आणि नकारात्मक उर्जेने भरलेल्या असतात.
घोड्याचा नाळ घराबाहेर ठेवण्याची ऐतिहासिक कारणे:-
प्राचीन काळी घोडे हे शक्ती, शौर्य आणि वेगाचे प्रतीक होते. युद्धे आणि प्रवासात घोड्यांचा वापर महत्त्वाचा होता. म्हणूनच, घराबाहेर घोड्याची नाळ ठेवल्याने घरातील सदस्यांना संरक्षण आणि शौर्य मिळेल असा समज होता. प्राचीन काळात लोखंड खूप महाग आणि दुर्मिळ होते. म्हणून घोड्याची नाळ घालणे हे संपत्ती आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जायचे. युरोपियन संस्कृतीत देखील घोड्याची नाळ एक “Lucky charm” मानली जात असे. भारतात व्यापारी मार्गांद्वारे किंवा ब्रिटिश काळात ह्या परंपरेचा प्रभाव वाढला.