मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी एक असे विधान केले आहे ज्यामुळे ते वादात सापडले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर ब्रीफिंग करणाऱ्या भारतीय कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे विजय शाह यांना सर्व स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. विजय शाह यांनी एखाद्या महिलेबद्दल अपशब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. जवळजवळ ४ वर्षांपूर्वी, प्रसिद्ध अभिनेत्रीने मंत्र्यांची मागणी पूर्ण न केल्यामुळे शूटिंग थांबवले होते.
त्यांच्या अहंकारामुळे विजय शाह यांनी मध्य प्रदेशात विद्या बालनच्या (Vidya balan) ‘शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. विजय शाह यांचे हे चार वर्षे जुने प्रकरण व्हायरल होत आहे. ज्यामुळे विजय शाह वादात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रकरण २०२० चे आहे, जेव्हा विजय शाह मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मंत्रिमंडळात वनमंत्री होते. त्यावेळी विद्या बालन मध्य प्रदेशच्या जंगलात ‘शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यावेळी बालाघाट जिल्ह्याच्या वन अधिकाऱ्यांनी निर्मिती पथकाच्या वाहनांना जंगलात जाण्यापासून रोखले होते. निर्मिती टीमला फक्त दोन गाड्या नेण्याची परवानगी देण्यात आली होती. वृत्तानुसार, विद्या बालनने विजय शाहसोबत जेवण करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी शूटिंग थांबवले होते. त्यामुळे शाह प्रसिद्धीच्या झोतात आले नंतर त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिले.
विजय शाह म्हणाले होते, ‘ज्यांनी माझ्याकडे शूटिंगची परवानगी मागितली होती, त्यांच्यासाठी मी बालाघाट येथे उपस्थित होतो. त्यांनी मला स्वतः जेवणासाठी आमंत्रित केले होते. पण मी त्यांना नकार दिला…’
विद्या बालन स्टारर ‘शेरनी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट जून २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही तर थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनीही चित्रपटाला खूप प्रेम दिले आहे.
विद्या बालनने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ही अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे.