उन्हाळ्यात गोड आणि रसाळ टरबूज (Watermelon) खाण्यात वेगळीच मजा आहे. केवळ चवीतच नाही तर टरबूज खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. टरबूजमध्ये 90 टक्क्यांपेक्षा (Health Tips) जास्त पाणी असते. ते शरीराला हायड्रेट ठेवते, म्हणून त्याला उन्हाळी सुपरफूड असंही म्हणतात.
हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहे, ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Watermelon Eating Mistakes) आहे. परंतु उन्हाळ्यात रसाळ टरबूज खाणं धोकादायक ठरू शकतं. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.
टरबूज खाल्ल्याने नुकसाने कसे होणार?
टरबूज खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि पचनसंस्था देखील मजबूत होते. परंतु बहुतेक लोक ते चुकीच्या पद्धतीने खातात. असं केल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ (Summer Tips) शकतात, त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. तज्ज्ञांच्या मते, जर टरबूज योग्यरित्या खाल्ले नाही तर आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होवू शकते. जेवणानंतर बरेच लोक टरबूज मिष्टान्न म्हणून खातात, परंतु ही एक मोठी चूक आहे. यामुळे पोटात गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टरबूजसोबत मीठही खाऊ नये, अन्यथा शरीरातील सोडियमची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे रक्तदाबासारख्या समस्या उद्भवू शकतात.
थंड कलिंगड खाणे मजेदार असते, पण जर तुम्ही ते फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच खाल्ले तर घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला होऊ शकतो, म्हणून प्रथम ते खोलीच्या तपमानावर ठेवा, नंतर ते खा. टरबूज नेहमी लहान भागात खावे.
You Might Also Like
रात्री टरबूज खाल्ल्याने शरीरात थंडी वाढू शकते, ज्यामुळे घसा खवखवणे आणि सर्दी यासारख्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून दुपारी टरबूज खाणे नेहमीच चांगले मानले जाते. टरबूज कधीही केळी, आंबा किंवा मिल्क शेकसोबत खाऊ नये. यामुळे पोटात किण्वन होऊ शकते, ज्यामुळे गॅस आणि पोटफुगीची समस्या उद्भवू शकते
टरबूज खाण्याची योग्य पद्धत कोणती?
तुम्ही जेवणाच्या 1-2 तास आधी किंवा नंतर टरबूज खाऊ शकता. दिवसा टरबूज खाणे चांगले, कारण ते लवकर पचते आणि शरीर थंड ठेवते. फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच थंड टरबूज खाण्याऐवजी, काही वेळ सामान्य तापमानावर ठेवल्यानंतरच ते खा. कलिंगड ताजे आणि लहान तुकडे करून चावून खा. यामुळे ते पोटात व्यवस्थित पचते आणि आपल्याला त्याचे संपूर्ण पोषण मिळते.