उन्हाळा सुरू असला तरी, राज्यात अजूनही अवकाळी पावसाचा धोका आहे. (Weather Update) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पाऊस पडत आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील काही भागात कमाल तापमान काही प्रमाणात कमी झाले आहे आणि सोमवारी अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच विदर्भातील सोलापूर आणि नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान कमी झाले आहे.
मुंबईला पाणीटंचाईला जावे लागणार सामोरे
मुंबई पाण्याच्या टंचाईच्या संकटाचा सामना करत आहे आणि त्यात फक्त २६ टक्के पाणी उपलब्ध आहे. एका महिन्यात पाण्यामध्ये १६ टक्के कपात झाली आहे. गेल्या महिन्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने बदल झाला आहे.
एका महिन्यात १६ टक्के कपात झाल्याने, तलावांमधील पाणीसाठा आता फक्त २६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट येऊ शकते. दररोज सुमारे ३,९५० दशलक्ष लिटर पाणी मिळते.
You Might Also Like
एका महिन्यापूर्वी पाणीसाठा ६,१६० दशलक्ष लिटर होता. तो आता ३,८८० दशलक्ष लिटरवर आला आहे, म्हणजे १६ टक्के घट. त्यामुळे १४ मे पर्यंत सातही तलावांमधील पाणीसाठा १० टक्क्यांवर येईल, असे जल अभियांत्रिकी विभागाचे म्हणणे आहे.
वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, साठवणुकीबाबत लवकरच आढावा बैठक घेतली जाईल आणि पाणी कधी कमी करायचे याचा निर्णय घेतला जाईल.